शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (19:09 IST)

दूध उकळल्यावर त्यातील पोषक घटक नष्ट होतात का,जाणून घ्या

Find
आपले वडीलधारी आपल्याला मुलांना नेहमी दूध पिण्याचा सल्ला देतात.कारण दूध हे पौष्टीक आणि सामर्थ्यवान आहे.परंतु वेळेनुसार दूधाबद्दलच्या धारणा देखील बदलतात.
काही लोकांना थंड दूध आवडत.तर काही लोक गरम दूध पिणे पसंत करतात. काही असे लोक आहे ज्यांना असे वाटते की दूध वारंवार गरम केल्याने त्यातील पोषक घटक नाहीसे होतात.चला वास्तव्यात काय आहे जाणून घेऊ या.
बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की दूधच कॅल्शियमचा एकमात्र पर्याय आहे .परंतु हे खरे नाही.दोन चमचे चियाच्या बियांमध्ये दूधापेक्षा 6 पटीने अधीक कॅल्शियम आहे. 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या मते, 100 मिली दुधात 125 मिग्रॅ. कॅल्शियम असतो.तर 100 ग्रॅम नाचणीमध्ये 344 मिलीग्राम कॅल्शियम असतो. तज्ञ म्हणतात की शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी, व्हिटॅमिन-डी मुबलक प्रमाणात असणे आवश्यक आहे.
 
दूध खराब होऊ नये म्हणून त्याला उकळवतात.हे उकळल्यावर त्याचा पोषक घटकांवर परिणाम होत नाही. आहारतज्ञांचा मतानुसार, अनेक वेळा दूध उकळण्यामुळे त्याचे पोषकद्रव्य नष्ट होत नाही.
 
आहारतज्ञांच्या मते, सकाळी दूध प्यायला घेऊ शकता, परंतु हे लक्षात ठेवा की हे अनोश्या पोटी घेऊ नका. असे केल्याने पचन खराब होते. गॅस तयार होऊ शकतो. आयुर्वेदानुसार, जर वात आणि कफ दोष असल्यास  सकाळी अनोश्या पोटी दूध घेऊ नका. ज्यांना बर्‍याचदा खोकल्याची तक्रार असते, त्यांनीसुद्धा सकाळी अनोश्या पोटी दूध घेणे टाळावे.
 
पोषक तत्त्वांच्या आधारे दुधाला संपूर्ण खाद्य म्हणतात, परंतु दुधाला अन्नाचा पर्याय बनविले जाऊ शकत नाही. शरीरात व्हिटॅमिन-सी, फायबरसह अनेक पोषक द्रव्ये आवश्यक असतात जे दुधात नसतात. म्हणून दुधाला लंच किंवा डिनरमध्ये बदलू नये.