1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 20 जानेवारी 2024 (13:29 IST)

Cancer Prevention Foods हे 5 पदार्थ कर्करोग सारख्या जीवघेण्या आजारांपासून रक्षण करतील

Cancer Prevention Foods
Cancer Prevention Foods कॅन्सर हा असा आजार आहे, त्याचे नाव ऐकताच सगळे घाबरतात. आपल्या हृदयात आणि मनात मृत्यूचे दृश्य दिसू लागते आणि त्याची प्रकरणेही सतत वाढत आहेत. मात्र आहाराच्या सवयींमुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
 
हिरव्या भाज्या आणि फळं
फळं आणि हिरव्या भाज्या हे संपूर्ण आहार मानले जाते. हे पोषक घटकांनी भरपूर असतात जसे- व्हिटॅमिन्स, एंटीऑक्सीडेंट आणि फायबर आढळतात. एक दिवसात किमान पाच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश केला पाहिजे.
 
शाकाहार
लाल मास स्वादिष्ट असलं तरी याचे कमी प्रमाणात सेवन करावे. निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात नॉन व्हेजचे सेवन कमी करावे किंवा बंद केल्यास अधिकच योग्य ठरेल.
 
संपूर्ण धान्य आणि शेंगा
ब्राउन राइस, बीन्स आणि डाळी यांचा जास्त प्रमाणात आहारात समावेश करावा. हे कार्ब्स, फायबर आणि फाइटोकेमिकल्सने भरपूर असतात जे कोलोरेक्टल, पोट आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगापासून दूर ठेवते. आरोग्य सुधारण्यासाठी तुमच्या आहारात धान्य आणि शेंगा यांचा समावेश करा.
 
​ओमेगा-3 
फॅटी फिशमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड भरपूर प्रमाणात असतं जे एंटी इंफ्लेमेटरी आणि कॅन्सर रोधी गुणांमुळे ओळखलं जातं. ब्रेस्ट, प्रोस्टेट आणि कोलोरेक्टल कॅन्सरपासून बचावासाठी दर आठवड्यात किमान दोनवेळा मासे आहारात सामील करावे आणि दररोज मुठभर नट्स खावे.
 
ग्रीन टी
ग्रीन टी कॅटेचिनने भरपूर एका औषधीप्रमाणे आहे, जे कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि प्रसार रोखते. दिवसातून किमान तीन कप ग्रीन टी पिण्याची सवय लावा आणि पण चहात साखर किंवा दूध घेऊ नका. ग्रीन टी स्तन, प्रोस्टेट, पोट, कोलन आणि त्वचेच्या कॅन्सरपासून मोठ्या प्रमाणात लढण्यास मदत करते. जर तुम्ही या सवयी 21 दिवस सतत अंगिकारल्या तर तुम्हाला निरोगी वाटू लागेल आणि तंदुरुस्तही राहाल. याशिवाय किरकोळ आजार टाळले जातात.
 
हे पदार्थ टाळावे
साखर आणि मीठ 
साखर आणि मीठाचे सेवन केल्याने वजन वाढतं आणि हाय बीपी तसेच कॅन्सर सेल्सला प्रोत्साहन देऊ शकते. याशिवाय तुमच्या रोजच्या आहारात साखरेवर आधारित कँडीज, भाजलेले पदार्थ आणि खारट स्नॅक्स कमी करा.
 
दारुचे सेवन टाळा
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने तोंड, घसा, यकृत, स्तन आणि कोलोरेक्टल भागात कर्करोग होऊ शकतो. विशेषतः महिलांसाठी दररोज एक पेय आणि पुरुषांसाठी दररोज दोन पेये मर्यादित असणे आवश्यक आहे.