गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 27 जानेवारी 2024 (17:57 IST)

Health Tips: हिवाळ्यात पोटदुखी आणि गॅस या समस्यांसाठी हे उपाय अवलंबवा

आजकाल बदलत्या लाइफस्टाइलमुळे लोकांना पचन संबंधित समस्या होत आहेत. खूप वेळेस अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे पोटदुखीची समस्या होते. यामुळे सकाळी उठल्यावर पचन संबंधी समस्यांचा सामना करावा लागतो. हे उपाय केल्याने तुम्ही पोटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवु शकाल चला जाणून घेवू या उपाय.
 
हळद प्रत्येक भारतीय किचन मध्ये उपलब्ध असते. हळदीच्या उपयोगाने पचन संबंधित समस्येपासून आराम मिळू शकतो. पचन संबंधित समस्यांपासून आराम मिळण्यासाठी सकाळी गरम पाण्यात हळद, काळी मिरी पूड, आले आणि मध मिसळा. हा हळदीचा चहा सेवन केल्याने ब्लोटिंगची  समस्या दूर होईल. 
 
अधिकतर लोक दिवसाची सुरुवात चहा पासून करतात. काही लोक दुधाचा चहा तर काही ग्रीन टी घेवून दिवसाची सुरुवात करतात. रोज आले आणि लिंबूचा चहा सेवन कराल तर तुम्हाला एसिडिटी आणि पचन संबंधित समस्येपासून आराम मिळेल. हा उपाय पचन संबंधित समस्यांपासून आराम मिळण्यासाठी खूप महत्वाचा आहे. 
 
जिरेपाणी मध्ये एंटीऑक्सीडेंट भरपूर मात्रामध्ये असतात. जिरेपाणी तुमच्या शरीराला डिटॉक्स करायला मदत करते. यात कार्मिनेटिवचा प्रभाव असतो. जे तुमच्या पोटाला थंड ठेवायला मदत करतात. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी जिरेपाणी सेवन करत असाल तर सूजने व एसिडिटी या समस्यांपासून आराम मिळेल. 
 
काळे मिठाला म्हणजे सेंधव मिठाला पिंक सॉल्ट पण म्हणतात. अशावेळेस तुम्ही काळे मिठापासून बनलेले सरबत घेवून दिवसाची सुरवात करू शकतात. याकरिता एक आल्याचा टुकडा गरम पाण्यात उकळवून घ्या. मग त्या पाण्यात काळे मीठ आणि मध मिक्स करा याला गाळून घ्या मग कोमट झाले की याचे सेवन करा.