गर्भधारणेनंतर वजन कमी कसे करावे, या 5 टिप्स जाणून घ्या
स्त्रियांमध्ये दिवसेंदिवस लठ्ठपणा वाढत आहे. प्रथम पीरियड्स नियमित नसल्यावर ही समस्या सुरू होते. मग गर्भधारणेनंतर लठ्ठपणा वाढू लागतो. लठ्ठपणा वाढण्यामुळे इतर समस्याही उद्भवू शकतात. थकवा, आळशीपणा सुरू होतो. थोडे अधिक चालण्यावर श्वासोच्छ्वास सुरु होतो, जास्त चालणे शक्य नसते, थोड्या प्रमाणात काम केल्याने थकल्यासारखे होते.
प्रसूतीनंतर आपले वजन कसे कमी करावे ते सांगत आहोत . ही माहिती सामान्य उपचार म्हणून सांगत आहोत. काहीही करण्यापूर्वी डॉ.चा सल्ला घ्यावा मगच करावे.
1 ओव्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. एका पात्रात ओवा घालून त्यात पाणी घालून ते पाणी उकळवून प्यावं.
2 अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सर्वात प्रभावी आहे.याचे सेवन आपण डॉ.च्या सल्ल्यानुसार करावे.
3 मेथीदाणे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहे.या मुळे उष्णता जाणवत असल्यास थोडंसं तूप घालून परतून घ्या आणि सकाळी अनोश्यापोटी थंड पाण्यासह घ्या. या मुळे पोटात उष्णता जाणवणार नाही.
4 रात्री झोपण्यापूर्वी जायफळाच्या दुधाचे सेवन करा.ऐकायला हे विचित्र आहे परंतु हे प्रभावी आहे.एक कप गरम दुधात जायफळाची पूड मिसळून पिऊन घ्या. या मुळे सुटलेले पोट आत जाते.
5 दालचिनी आणि लवंगाचे सेवन केल्याने देखील पोट कमी होत. अर्धा चमचा दालचिनी आणि 2-3 लवंगा घेऊन पाण्यात उकळवून घ्या.एक महिना याचे सेवन करा फरक दिसेल.