शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 1 नोव्हेंबर 2025 (15:47 IST)

Daily Almonds Intake एक दिवसात किती बदाम खावेत? हिवाळ्यात दररोज १० बदाम खाल्ल्यास काय होते?

Daily Almonds Intake Limit in India
आयुर्वेदानुसार बदाम उष्ण प्रवृत्तीचे मानले जातात. त्यामुळे, सामान्यतः दररोज ४ ते १० भिजवलेले बदाम खाण्याची शिफारस केली जाते.
 
प्रमाण कशावर अवलंबून असते?
वजन/कॅलरी लक्ष्य: बदाम हे कॅलरी आणि फॅट्समध्ये जास्त असतात, त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास, प्रमाण कमी ठेवणे (उदा. ६-८) चांगले.
शारीरिक क्रियाकलाप: जर तुम्ही ॲथलीट असाल किंवा जास्त शारीरिक श्रम करत असाल, तर तुम्ही १० ते १५ बदाम (जास्त ऊर्जा आणि पोषणासाठी) खाऊ शकता.
पचन क्षमता: बदाम पचायला जड असतात, त्यामुळे हळूहळू सुरुवात करावी.
 
हिवाळ्यात दररोज १० बदाम खाण्याचे फायदे
हिवाळ्यात दररोज १० बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते, विशेषतः जर ते भिजवून खात असाल तर-
ऊर्जा आणि ऊब : बदाम हे नैसर्गिकरित्या ऊर्जा देणारे असतात. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ते मदत करतात.
मेंदूचे आरोग्य : बदाम व्हिटॅमिन ई, राइबोफ्लेविन आणि एल-कार्निटाइन चा चांगला स्रोत आहेत, जे स्मरणशक्ती आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात.
रोगप्रतिकारशक्ती : बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स हिवाळ्यातील संसर्ग आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
हृदयाचे आरोग्य : यामध्ये 'चांगले फॅट्स' असतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
त्वचा आणि केस: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. बदाम त्वचेला आतून पोषण देतात आणि व्हिटॅमिन ई मुळे त्वचा चमकदार आणि केस निरोगी राहतात.
हाडांची मजबुती : बदाम कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असल्यामुळे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.
 
बादाम कधी खावेत?
सकाळी नाश्त्यात (ओट्स/दहीसोबत) किवा दुपारी स्नॅक म्हणून किवा संध्याकाळी ४ वाजता (लहान भुकेसाठी)
 
बदाम भिजवण्याची सोपी आणि योग्य पद्धत
उच्च रक्तदाब असल्यास भिजवलेले बदाम खाणे अधिक फायदेशीर कारण पचायला सोपे, पोषकतत्व जास्त मिळतात.
बदाम पाण्याने २-३ वेळा चांगले धुवून घ्या ज्याने धूळ/कीटकनाशके निघतील.
बदाम एका भांड्यात घ्या, त्यावर दुप्पट पाणी घाला.
६-८ तास अर्थातच रात्रभर भिजू द्या.
सकाळी भिजलेले पाणी फेकून द्या (फायटिक ऍसिड निघते).
रात्रभर भिजवत नसाल तर कोमट पाण्यात दोन तास भिजवून देखील सेवन करु शकता.
भिजवलेले पाणी मुळची पिऊ नका.
इच्छा असल्यास साल काढा. हाताने दाबल्यास साल सहज निघते (पचन सुधारते).
थेट खा किंवा दही, ओट्स, स्मूदीमध्ये मिक्स करा.
 
अस्वीकारण: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.