1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (12:07 IST)

कोरोनाचे नवीन व्हेरियंटची लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

covid
सणांच्या आधी, भारतात कोरोना विषाणूच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा वेग पकडला आहे. कोविडची वाढती प्रकरणे रोखण्यासाठी महाराष्ट्र, केरळ या राज्यांनीही अॅडव्हायजरी जारी केली आहे. पुन्हा कोरोना डोकं वर काढतं आहे. 
 
नवीन सब-व्हेरियंटची लक्षणे काय आहेत-
कोविड-19 च्या इतर प्रकारांप्रमाणे या प्रकाराची लक्षणे देखील दिसून येतील, परंतु जर आपण या नवीन व्हेरियंटबद्दल बोललो, तर शरीरातील वेदना ही मुख्य लक्षण आहे.
शरीरात बऱ्याच काळापासून वेदना होत असेल तर त्याला कोविड चाचणी करणे आवश्यक आहे. याशिवाय घसा खवखवणे, थकवा येणे, कफ आणि नाक वाहणे, खोकला येणं, छातीत दुखणं, ऐकण्यात अडचण येणं, कापरं भरणं ही देखील या सब व्हेरियंटची लक्षणे असू शकतात.  .
 
खबरदारी- 
मास्कचा वापर करावे
गर्दीत जाण टाळावे
साबणाने आणि स्वच्छ पाण्याने हात वारंवार धुवावे. 
सामाजिक अंतर राखावे. 
कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा. 

 Edited By - Priya Dixit