सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (08:30 IST)

काळी मिरीचे 10 मौल्यवान गुण जाणून घ्या

आपल्या स्वयंपाकघरातील अन्नाची चव वाढवण्यासाठी आणि मसाले म्हणून वापरल्या जाणार्‍या काळीमिरी आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याचे सेवन करण्याचे बरेच फायदे आहेत. हे सॅलड, फळे किंवा पिझ्झा किंवा पास्ता असो, सर्वत्र वापरलेली मिरपूड प्रत्येक गोष्टीची चव वाढवते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असते.
 
काळी मिरीचे 10 मौल्यवान गुण जाणून घ्या-
 
1 दात संरक्षण: हिरड्यांमध्ये सूज आणि श्वासात दुर्गंधीचा त्रास असल्यास एक चिमूटभर मीठ आणि एक चिमूटभर मिरपूड पाण्यात मिसळून हिरड्या वर चोळा.आपण पाण्याऐवजी लवंगाचे तेल वापराल तर त्याचा परिणाम आणखी जलद होईल म्हणजे काळी मिरीचा वापर करा आणि चेहऱ्यावरील हसू कायम ठेवा.
 
2 डिप्रेशन- काळीमिरी वापरल्याने शरीरात सेरोटोनिन हार्मोन तयार होतो. जे चांगल्या मूडसाठी जबाबदार असतो. सेरोटोनिनचे प्रमाण वाढल्याने डिप्रेशनात फायदा होतो. म्हणून आपल्या दैनंदिनीमध्ये काळीमिरी वापरा आणि आनंदी राहा.
 
3 चवीत छान -प्रत्येक बेचव वस्तूंमध्ये काळी मिरी घातल्याने हे जादू करते. पाश्चात्य देशांमध्ये बर्‍याचदा फिकट आणि बेचव अन्न खाल्ले जाते.अशा परिस्थितीत जर अन्नात काळीमिरी घातली तर मसाल्यांची उणीव भासत नाही. 
 
4 सर्दी-खोकला असल्यास -काळीमिरी खोकल्यात देखील फायदेशीर  आहे. सर्दी-खोकल्यापासून आराम देणाऱ्या कफ सिरप मध्ये देखील काळीमिरी वापरतात.रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध,आल्याचा रस,सह चिमूटभर काळीमिरी घेतल्याने कफ कमी होतो.चहामध्ये देखील काळीमिरी मिसळून प्यायल्याने फायदा होतो.
 
5  कर्करोगावर प्रतिबंध - मिशिगन विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासानुसार मिरपूडमध्ये पिपेरीन नावाचे एक रसायन असते, जे कर्करोगाशी लढायला मदत करते. अहवालानुसार काळी मिरी हळद सह घेतल्यास त्याचा परिणाम आणखी जास्त होतो. विशेषत: स्त्रियांमध्ये, स्तन कर्करोग रोखण्यासाठी हे चांगले परिणाम देते.
 
6 स्नायू दुखणे: काळी मिरीमध्ये असलेल्या पिपेरीन मुळे रक्त परिसंचरण वाढते. यामुळे स्नायूंच्या वेदना कमी होतात.तेल कोमट  गरम करावे, त्यात काळी मिरी घाला आणि त्या तेलाने पाठीची आणि खांद्याची मालिश करा. संधिवात रोगात देखील काळी मिरी खूप फायदेशीर ठरते.
 
7 पचनासाठी -काळीमिरीमुळे पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड जास्त प्रमाणात तयार होतो,हे ऍसिड पचनासाठी मददगार आहे. या मुळे पोटफुगी,पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेमध्ये देखील आराम मिळतो. ऍसिडिटीचा आणि गॅस चा त्रास असल्यास तिखटाचा वापर करू नका.या ऐवजी काळीमिरीचा वापर करा. 
 
8 चेहऱ्यावर तजेलपणा -जाड दळलेली काळीमिरी साखर आणि तेलासह मिसळून चेहऱ्यावर लाऊन घ्या. या मुळे चेहऱ्याची घाण निघते रक्तविसरण वेगाने होतं.चेहऱ्यावर तजेलपणा येतो.
 
9 वजन नियंत्रित करते- एका संशोधनानुसार काळी मिरी शरीरातील चरबी कमी करण्याचे  देखील कार्य करते. हे पचन प्रक्रियेस गती देते आणि कमी वेळात जास्त कॅलरी वापरली जाते. हे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील प्रभावी आहे.
 
10 सुंदर केसांसाठी -डोक्यात कोंड्याचा त्रास असल्यास काळी मिरी मिसळून डोक्याची मॉलिश करा. अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवून घ्या.लगेचच शॅम्पू वापरू नका. या मुळे डोक्यातील कोंडा कमी होईल आणि केस चमकतील. लक्षात ठेवा की काळीमिरी जास्त प्रमाणात मिसळू नका,अन्यथा जळजळ होईल.