शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (18:36 IST)

आलू बुखारा रसाळ फळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

आलू बुखारा हे खूपच चविष्ट फळ आहे.याला इंग्रजीत प्लम म्हणतात.हे खाण्यात आंबट गोड लागतात. हे ताजे किंवा वाळवून देखील खातात.आलू बुखाराचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.जर आपल्याला हे आवडत नाही, तर याचे फायदे जाणून घेतल्यावर आपण हे खाण्यास सुरुवात कराल.
 
चला आलू बुखाऱ्याचे फायदे जाणून घ्या.
 
1 100 ग्राम आलू बुखाऱ्यात सुमारे 46 केलोरी असते. या मध्ये इतर फळांपेक्षा कमी कॅलरी असते.म्हणून हे आपले वजन नियंत्रित करण्यात उपयुक्त असतं.
 
2 आलू बुखाऱ्यात सॅच्युरेटेड फॅट नसत या मुळे हे खाल्ल्यावर पोषक घटक मिळतात आणि आपले वजन देखील वाढत नाही.
 
3 हे डायट्री फायबरने समृद्ध आहे,या मध्ये सर्बिटॉल आणि आयसेटीन प्रामुख्याने आहे.विशेषतः हे फायबर्स,शरीराच्या अवयवाचे कार्य सुलभ करतात आणि पचनक्रिया सुधारतात.
 
4 याचे दररोज सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट देखील साफ होण्यात मदत करत.
 
5 या मध्ये असलेले व्हिटॅमिन सी आपले डोळे आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि रोग प्रतिकारशक्ती देखील वाढवतात. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन-के आणि बी 6 देखील मुबलक प्रमाणात आढळते. 
 
6 हे रक्त साकळण्यापासून बचाव करतो, या मुळे रक्तदाब आणि हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते.हे अल्झायमर चा धोका टाळतो.
 
7 आलू बुखारा आपल्या फुफ्फुसांना सुरक्षित ठेवण्यासह तोंडाच्या कर्करोगापासून बचाव करतो.या व्यतिरिक्त हे दम्यासारख्या रोगांपासून बचाव करण्यात मदत करतो.
 
8 हे सूर्याच्या यूव्ही किरणांपासून आपले रक्षण करतो.या व्यतिरिक्त या मध्ये व्हिटॅमिन-ए आणि बीटा कॅरोटीन देखील मुबलक प्रमाणात आढळत, जे डोळे आणि इतर अवयवांसाठी फायदेशीर आहे. यामुळे डोळ्यांची दृष्टीही तीक्ष्ण होते
 
9 सालांसह आलू बुखारा खाल्ल्याने स्तनाचा कर्करोग रोखण्यास मदत करतो. हे कर्करोग आणि ट्युमरच्या पेशींना वाढण्यापासून रोखण्याचे काम करतो.
 
10 .स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस रोखण्यासाठी आलुबुखारा अत्यंत  उपयुक्त आहे.रजोनिवृत्तीच्या नंतर स्त्रियांनी याचे सेवन केल्याने स्वतःला ऑस्टिओपोरोसिस पासून वाचवू शकते.
 
11 दररोज आलू बुखारा खाल्ल्याने आणि त्याच्या गर लावल्याने चेहऱ्यावर 
नैसर्गिक चमक येते,तसेच त्वचेला सर्व पोषक घटक मिळतात,ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
 
12 या मध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट्स आपली त्वचा तसेच मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच आपला ताण कमी करण्यात देखील महत्वाची भूमिका बजावतो .
 
13 हे आपल्या बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.आलुबुखाऱ्यात आयरन मुबलक प्रमाणात आढळतात जे रक्त पेशी तयार करण्यात मदत करतात.पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळल्याने शरीराच्या पेशी मजबूत बनतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहते.