शनिवार, 28 जानेवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified बुधवार, 16 जून 2021 (17:23 IST)

योग मुद्रासन करण्याची विधी आणि त्याचे फायदे जाणून घ्या

मनाला एकाग्रचित्त करण्यासाठी  हे आसन केले जाते.चला हे करण्याची विधी आणि त्याचे इतर फायदे जाणून घेऊ या.
विधी- 
सर्वपथम डावा पाय उचला आणि उजव्या मांडीवर असं ठेवा की डावा पायाची टाच नाभीच्या खाली असावी.
उजवा पाय उचलून असं ठेवा की डाव्या पायाच्या टाचासह नाभीच्या खाली एकत्र जोडा.
दोन्ही हात मागे नेत डाव्या हाताचे मनगट उजव्या हाताने धरा.श्वास सोडत वाकत नाकाला जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.आता हात बदलून पुन्हा ही प्रक्रिया करा.
आता पायाची स्थिती बदलून पुन्हा ही क्रिया करा.
 
फायदे-
हे आसन केल्याने चेहरा सुंदर होतो.
स्वभाव नम्र होतो.
मन एकाग्रचित्त होतं