मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 21 जून 2022 (08:43 IST)

21 जून जागतिक योग दिन विशेष : जागतिक योगदिन का साजरा केला जातो जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

yoga day
प्रत्येक वर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा केला जातो.हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या निमित्ताने कोट्यवधी लोक एकत्ररित्या योग करून निरोगी राहण्याचा आणि शांततेचा संदेश देतात. योग दिन का साजरा केला जातो आणि या दिवसाची सुरुवात कधी पासून झाली जाणून घेऊ या.
 
1 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाला सप्टेंबर 2014 मध्ये योग दिवस करण्याचा प्रस्ताव मांडला .
 
2 संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून रोजी योग दिन साजरा करण्याचा उपक्रम अवघ्या 90 दिवसांत पूर्ण बहुमताने पारित केला. यापूर्वी संयुक्त राष्ट्रामध्ये कोणताही दिवस ठराव इतक्या लवकर मंजूर झालेला नाही.
 
3 यानंतर, काही देश वगळता प्रथमच 21 जून 2015 रोजी संपूर्ण जगभर योग दिन साजरा करण्यात आला.
 
4 21 जून हा दिवस निश्चित करण्यामागे एक कारण म्हणजे 21 जून हा वर्षाचा सर्वात लांब दिवस आहे, हा दिवस मनुष्याचे दीर्घ आयुष्य दर्शवणारा आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 21 जून रोजी सूर्य लवकर उगवतो  आणि उशीरा मावळतो .म्हणूनच, या दिवशी सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर सर्वात प्रभावी असतो.
 
5 काही विद्वान यामागील कारण देखील देतात की उन्हाळ्यातील संक्रांतीच्या पश्चात पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी योगाची दीक्षा देऊन शिवाने आपल्या सात शिष्यांना योगाचा प्रथम प्रसार किंवा उपदेश दिला. हा दिवस शिव आणि दक्षिणायण अवतार दिवस म्हणूनही ओळखला जातो.
 
6 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात लांब दिवस आहे, ज्याला ग्रीष्म संक्रांती देखील म्हणू शकतो.उन्हाळ्याच्या संक्रांतीनंतर, सूर्य दक्षिणायन होतो आणि सूर्याची दक्षिणायनची वेळ आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
 
7 जगभरातील लोकांनी चांगले आरोग्य मिळविण्यासाठी योगा कडे वळले पाहिजे.आणि नियमितपणे योग करून स्वतःला  निरोगी ठेवावे.तसेच सर्व धर्माचे लोक जाती,पंथ आणि देशाच्या भावनेने उंच उठून प्रेम आणि आत्मीयतेने योगा करावे. हाच हेतू योग दिवस साजरे करण्याचा आहे.योग माणसांना आपसात जोडून परस्पर प्रेम आणि सद्भावतेची भावना विकसित करतो.
 
8  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला, ज्यामध्ये, 35,985  लोक आणि  84 देशांच्या प्रतिनिधींनी दिल्लीच्या राजपथवर योगाचे 21आसन केले.
 
9 योग दिनाच्या पहिल्या समारंभाने दोन गिनीज रेकॉर्ड मिळवले. प्रथम रेकॉर्ड 35 हजाराहून अधिक लोकांसह योगा करणे दुसरे आणि या कार्यक्रमात भाग घेणार्‍या 84 देशांतील लोकांनी या समारोहात भाग घेतला .
 
10 जगभरात योगाचे महत्त्व 3 दशकात अधिक वाढले आहे.योग आता कोणत्याही देश किंवा धर्माला बांधलेला नाही. हे  सीमा ओलांडून घराघरात चांगले आरोग्य मिळविण्यासाठी केले जात आहे.