आपणास ही 5 लक्षणे आढळल्यास सूर्यदेवाच्या शरणी जावे
आज आम्ही आपणास सांगणार आहोत अश्या 5 लक्षणांबद्दल जे शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेला दर्शवतात. आपणास देखील खालील सांगितलेले हे लक्षणे आढळल्यास, त्वरितच सूर्य देवाच्या शरणी जावे आणि नियमितपणे सूर्यप्रकाश घेण्यासाठी उन्हात बसावे.
1 हाडे आणि स्नायू कमकुवत झाल्यास - जर आपले हाडांमध्ये वेदना सह कमकुवतपणा जाणवत असल्यास, ही व्हिटॅमिन डी ची कमतरता होऊ शकते. व्हिटॅमिन डी हे हाडांसाठी महत्त्वाचं असून दात आणि स्नायूंसाठी देखील महत्त्वपूर्ण पोषक घटक आहे.
2 उच्च रक्तदाब असल्यास - जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास, याचा थेट परिणाम आपल्या रक्तदाबावर होऊ शकतो. याचा कमतरतेमुळे सहसा उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो.
3 तणाव आणि दुःख - विशेषतः महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता तणावाची समस्या उद्भवते आणि या मुळे ते नेहमीच उदास आणि दुखी असतात. बायकांसाठी व्हिटॅमिन डी ची आवश्यकता अधिक प्रमाणात असते.
4 मूडवर परिणाम - शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरते मुळे याचा थेट परिणाम आपल्या मूडवर होतो. या कमतरतेमुळे शरीरातील सेरोटोनिन नावाच्या हार्मोन्सच्या उत्पादनावर परिणाम होतो. जे आपल्या बदलणाऱ्या मूड साठी कारणीभूत असू शकतो.
5 आळशीपणा आणि थकवा - जर आपण स्वतःला ऊर्जावान समजत असाल आणि काही वेळा थकलेलं वाटत असल्यास किंवा खूप आळशीपणा वाटत असल्यास तर आपल्या व्हिटॅमिन डी च्या पातळीची तपासणी करवावी. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे असे होऊ शकतं.