गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 16 मे 2021 (08:00 IST)

आरोग्याचे गुपित दडलेले आहे कच्च्या कैरीत जाणून घ्या

The secret of health is hidden in raw curry health tips
उन्हाळ्यात कच्ची कैरी बऱ्याच रोगांपासून बचाव करते. उन्हाळ्यात याचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. आरोग्याच्या दृष्टीने देखील हे खाणे फायदेशीर आहे. बरेच लोक कच्ची कैरी खात नाही .याचे कारण म्हणजे त्यांचे दात आंबतात. कच्ची कैरी खाण्याचे फायदे जाणून घ्या. 
 
* कच्च्या कैरीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. या मुळे शरीरात रक्त विसरणं चांगलं होत.हे नवीन रक्त पेशी तयार करण्यासही उपयुक्त ठरते.
 
* कच्च्या कैरीची लोंजी,भाजी,लोणच बनवतात आणि मोठ्या चवीने खातात. अन्नाची चव वाढविण्याबरोबरच प्रतिकारशक्ती देखील वाढवते.
 
* लोंजीच्या स्वरूपात खाल्ल्याने आतड्यातील होणारे संसर्ग देखील दूर होते. या मुळे लिव्हर चांगले राहते. 
 
* गरोदरपणात कच्ची कैरी खाणे फायदेशीर असते. या मुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी,उलटी सारखे त्रास होत नाही. कच्ची कैरी खाल्ल्याने स्त्रियांमध्ये अँटीऑक्सीडेंट वाढतात. या मुळे आई आणि बाळ दोघांचे अनेक आजारांपासून संरक्षण होते.
 
* कच्ची कैरी खाल्ल्याने स्कर्व्ही रोग कमी होण्यास मदत मिळते.या मुळे व्हिटॅमिन सी ची कमतरता दूर होते. स्कर्व्ही एक प्रकारचे आजार आहे जे व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतो. या मुळे शरीरावर चट्टे होतात. 
 
* कच्ची कैरीच्या सेवनाने दात मजबूत होतात. या मध्ये असलेले व्हिटॅमिन सी मुळे दातांना मजबुती मिळते. या मुळे हिरड्यातून येणारे रक्तस्त्राव देखील थांबते.आपण कच्ची कैरीचे सेवन केल्याने  तोंडाचा येणार घाणेरडा वास देखील नाहीसा होतो. 
 
* कच्ची कैरी खाल्ल्याने उन्हाळी लागत नाही .तसेच ऊन आणि पाण्याची कमतरता देखील होऊन निर्जलीकरण होत नाही. 
पाण्यात उकळवून थंड करून पन्हे बनवतात. या मध्ये साखर आणि जिरे घालून पितात. उन्हाळ्यात पिऊन तजेलपणा जाणवतो. तसेच घामाच्या वासापासून आराम मिळतो.
  
* मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही फायदेशीर मानली आहे. या मुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. शरीरातील आयरन ची कमतरता देखील पूर्ण करते. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरचा सल्ला घेऊनच  याचे सेवन करावे. 
 
* कच्च्या कॅरीचे सेवन केल्याने केस जाड आणि चमकदार बनतात. यासह, त्वचेत घट्टपणा देखील येतो.
 
* कच्च्या कैरीचे सेवन केल्याने मूळव्याधच्या त्रासामध्ये देखील आराम मिळतो. मूळव्याध हे पाचन तंत्राशी निगडित आहे. कच्ची कैरी पाचन क्रिया मजबूत करते. ही फायबरचे चांगले स्रोत आहे. या मुळे कडकपणा कमी होतो आणि आराम मिळतो.