बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (08:00 IST)

पावसात अन्न विषबाधा होण्याचा धोका असतो, सावधगिरीसाठी या 5 टिप्स अवलंबवा

मेघसरी सुरु झाल्या आहेत तरी तापमान अद्याप कमी झाले नाही.पावसाळा आणि उन्हाळ्याचे हे संमिश्र हंगाम आरोग्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे.वारंवार तहान लागल्यावर व्यक्ती थंड पितो,तर या हंगामात अन्न खराब होण्यास काही वेळ लागत नाही.या हंगामात अन्नातून विषबाधा होण्याच्या धोका नेहमीच असतो.
 
अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.अन्नातून  विषबाधा होण्याचे सर्वात मोठे लक्षण आहे की जेवल्यावर एक ते सहा तासाच्या दरम्यान उलटया होणं सुरु होत.तर असं समजावं की त्या व्यक्तीला अन्नातून  विषबाधा झाली आहे.त्यावर नियंत्रण करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
 
हे मुख्यत: बॅक्टेरियायुक्त अन्न खाण्यामुळे होते. हे टाळण्यासाठी, प्रयत्न केला पाहिजे की घरात फक्त ताजे तयार केलेले अन्नच खावे. जर आपण बाहेरील खाद्यपदार्थ खात असाल तर मग हे लक्षात ठेवा की उघडे ठेवलेले खाद्य पदार्थ आणि अति थंड आणि असुरक्षित असलेले अन्न खाऊ नये.
 
या दिवसात ब्रेड,पाव,इत्यादींमध्ये बुरशी लागते म्हणून ते खरेदी करताना किंवा खाण्यापूर्वी त्यावर त्याची उत्पादन तारीख तपासा.घराच्या स्वयंपाकघरातही स्वच्छता ठेवा.घाणेरडी भांडी वापरू नका.कमी ऍसिड असलेले अन्न खा.
 
 
पुढील कारणांमुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो.
 

1 घाणेरड्या भांड्यात अन्न खाल्ल्याने.
 

2 शिळे आणि बुरशीचे अन्न खाल्ल्याने .
 

3 कमी शिजलेले अन्न खाल्ल्याने .
 

4 मांसाहार करू नये.
 

5 फ्रिजमधील बऱ्याच वेळा ठेवलेल्या अन्नाला खाणे टाळावे.