1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 14 एप्रिल 2021 (09:35 IST)

उन्हाळ्यात घामाची दुर्गंधीपासून सुटका मिळविण्यासाठी हे करा

उन्हाळ्यात शरीरातून येणार्‍या घामामुळे दुर्गंध येत असेल तर केवळ डियो लावून काम धकत नाही कारण अनेकदा त्यावर पुन्हा घाम आल्यावर अजूनच दुर्गंध पसरतो. काही उपाय अमलात आणून यापासून सुटका होऊ शकतो-
 
शरीरात येणार्‍या घामाची दुर्गंधीपासून सुटका मिळविण्यासाठी सर्वात योग्य पर्याय हे आहेत-
अॅटी-बॅक्टीरियल साबणाने अंघोळ करावी.
शरीर योग्यरीत्या स्वच्छ करावं.
एंटीपर्सपिरेंट वापरवं.
या व्यतिरिक्त दररोज पाय धुणे आणि जोडे-चपला आणि मोजे स्वच्छ केल्याने शरीराच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळू शकते.
अंघोळ केल्यानंतर शरीर पुसल्याशिवाय कपडे घालू नये. अशात लगेच घाम येत नाही.
आर्मपिट्स शेव किंवा वैक्स करत राहावी कारण केसांमुळे अधिक घाम येतो.
अधिक मसालेदार भोजनाचे सेवन करु नये आणि स्वत:ला हायड्रेटेड ठेवा.
कॉटनचे आरामदायक कपडे परिधान करावं.
धूम्रपान करु नये कारण याने आपल्या शरीराचं तापमान वाढतं.
नैसर्गिक परफ्यूम वापरा.