बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 16 मे 2021 (15:01 IST)

आजार टाळण्यासाठी पायी चाला, पायी चालण्याचे 5 फायदे जाणून घ्या

ज्या प्रकारे जीवनशैली मध्ये सततचे बदल होत आहे. चांगली जीवनशैली अंगीकार करणे आवश्यक आहे .कोरोना विषाणूचा आपल्यावर सर्वाधिक प्रभाव पडला आहे. काही लोकांनी आपल्या जीवनशैलीत बदल केले आहे. परंतु काही लोकांनी आळशीपणा मुळे बदल केले नाही. किंवा करत नाही.
काही उपक्रम असं असतात ज्यांना आपण निरोगी असाल तरीही केले पाहिजे.बारीक आणि दुबळे लोक वॉक करतात तर लोक त्यांना म्हणतात की आपल्याला वॉक करायची काय गरज आहे परंतु तंदुरुस्त राहण्यासाठी वॉक करणे आवश्यक आहे. पायी चालण्याचे 
5 फायदे जाणून घ्या.  
 
1 मेंदू - आपण एक आठवडा 2 तास प्रामाणिकपणे वॉक करता तर ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो.  
 
2 वजन -दररोज 30 मिनिटे पायी चालण्यामुळे 50 टक्के लठ्ठपणा कमी होतो. हे आपली प्रतिकारक शक्ती देखील वाढवते. 
 
3 हाडे- जेव्हा आपण चालता तेव्हा आपले संपूर्ण शरीर कार्य करत अशा परिस्थितीत आठवड्यातून 4 तास वॉक केल्याने हिप फ्रॅक्चर होण्याचा धोका 40 टक्क्यांनी टळतो . 
 
4 मूड-मूड स्विंगमुळे बर्‍याचदा चांगले संबंधही खराब होऊ शकतात. दिवसातून 30 मिनिटे चालण्यामुळे औदासिन्यतेचा धोका 36 टक्क्यांनी कमी होतो.
 
5 क्रिएटिव्ह आयडिया-  आपण मोबाईल न घेता चालता तेव्हा आपले मेंदू काम करत. दरम्यान आपल्या डोक्यात बऱ्याच कल्पना सुचतात. सकाळी वॉक करताना दिवसभराच्या नियोजनाचे विचार करता आणि रात्री वॉक करताना दुसऱ्या दिवसाच्या नियोजनाबद्दल विचार करता. म्हणून हेडफोन न लावता वॉक करा.