थंडीत कुडकुडायला लागलो की, आपली पावले गरम चहा किंवा कॉफी घेण्यासाठी वळतात. कारण थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी पोटात काहीतरी गरम गरम जाणे आपल्याला आवश्यक वाटत असते. अर्थात चहा कॉफी गरम असली तरीही फारशी आरोग्यदायी नाही. म्हणूनच आहारात बदल करत
				  													
						
																							
									  
	
	हिवाळ्यात उष्ण पदार्थ खाण्याचा सल्ला घरातील ज्येष्ठ मंडळी देतात. हिवाळ्यात लसूण, आले आणि काळी मिरी यांचे सेवनही अधिक प्रमाणात केले जाते. तसेच हिवाळ्याची हुडहुडी भरायला लागली की बहुतेक घरातील आया डिंक, कणीक, सुकामेवा, तूप अशा गोष्टींची जमवाजमव करून डिंकाचे लाडू वळायला घेतात. डिंक हा शरीराला आरोग्यदायी आणि ऊर्जा प्रदान करणारा असतो. डिंकाच्या लाडवांव्यतिरिक्त डिंक तुपात तळूनही खातात. डिंकाच्या सेवनाने उष्णता मिळतेच, पण हाडांच्या वेदनाही दूर होतात. 
				  				  
	 
	हा डिंक अर्थातच खाण्याचा असतो. बाभळीच्या झाडाचा डिंक सर्वात चांगला असे मानले जाते. डिंकाचा वापर औषधे, बेकरी पदार्थ आणि सौंदर्य प्रसाधनांमध्येही केला जातो. एनर्जी ड्रिंक्स, आईस्क्रीमम ध्येही केला जातो. डिंक एरवी कोणत्याही ऋतुत सेवन करण्याचा आग्रह होत नाही, पण हिवाळ्यात असा आग्रह केला जातो. हिवाळ्यात डिंक सेवनाचा आग्रह का केला जातो हे समजून घेऊया. त्याआधी कोणता डिंक सेवनासाठी चांगला ते जाणून घेऊया. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	डिंक कसा असावा?: कोणत्याही झाडाच्या बुंध्याला चीर दिल्यास त्यातून एक प्रकारचा रस बाहेर गळतो, त्याला त्या झाडाचा डिंक असे म्हणतात. पण म्हणून दिसेल त्या झाडाचा डिंक खाण्यायोग्य नसतो हे देखील समजून घ्या. बाभळीचा डिंक हा आरोग्यदायी असतो, आणि बाजाराततो सहजपणे मिळतो.
				  																								
											
									  
	
	सांधेदुखीच्या वेदना दूर : हिवाळ्यात डिंकाचे सेवन करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डिंकामुळे शरीराला उष्णता मिळते, टिकून राहाते. सकाळच्या वेळी डिंकाचे सेवन केल्याचा फायदा होतोच. हिवाळ्यात डिंकाचे सेवन केल्याने मेंदूची झालेली झीज आणि सांधेदुखी, सांध्याच्या इतर समस्यांत फायदा होतो. डिंक हाडांना मजबूत करण्यास मदत करतो. त्याशिवाय नैराश्यापासूनही डिंक बचाव करतो तसेच स्नायू बळकट बनवण्यासाठीही डिंक आवश्यक असतो.
				  																	
									  
	 
	स्टॅमिना आणि प्रतिकार क्षमताः डिंकाचे सेवन केल्यानंतर शरीराची रोगप्रतिकार क्षमता सुधारते. हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाल्ल्यास व्यक्तिचा स्टॅमिना वाढतो. 
				  																	
									  
	 
	स्तनवृद्धी- स्तनपान देणार्या आयांना प्रसूतीनंतर डिंकाचे लाडू सेवनास दिले जातात. डिंक उष्ण असल्याने प्रसूतीनंतर झालेली झीज भरून काढत स्तन्यवृद्धी करण्यासही डिंक मदत करतो. हाडे मजबूत करत असल्याने बाळंतिणीच्या आहारात डिंक लाडवाचा समावेश करावा.
				  																	
									  
	 
	त्वचेसाठी फायदेशीरः डिंक हा त्वचेसाठीही फायदेशीर असतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी, चेहर्याला आतून ओलसरपणा देण्यासाठी डिंकफायदेशीर असतो.
				  																	
									  
	 
	फुफ्फुसांची समस्याः ज्या व्यक्तींना फुफ्फुसांशी निगडीत समस्या आहे. ज्यांना थकवा येतो, अशक्तपणा आहे त्या व्यक्तींसाठीही डिंक हा उपयु्क्त आहे. 
				  																	
									  
	 
	हृदयासाठी उपयुक्त :  रोज भाजलेला डिंक सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो. हृदयसंबंधी इतर रोगांमध्येही याचा फायदा होतो. शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठीही डिंकाचे लाडू किंवा डिंक, खोबरे, खारीक असे पंचखाद्य जरूर सेवन करावे. 
				  																	
									  
	
	डिंक शरीराला उष्णता आणि ऊर्जा पुरवतो, त्यामुळे हिवाळ्यात डिंकाचे सेवन अवश्य करावे. डिंकाचे सेवन करताना तो तुपात तळून किंवा भाजून सेवन करावा. त्यामुळे तो पचायला सोपाही असतो. त्याचा शरीराला योग्य फायदाही होतो. 
				  																	
									  
	 
	डॉ. संतोष काळे