1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (08:10 IST)

अक्कल दाढेच्या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

home remedies to cure wisdom tooth pain home remedies to get acnebeared pain in marathi  akkal dadhechya dukhnyapasun sutkesathi che upay arogya marathi in marathi webdunia marathi
अक्कल दाढ निघणे खूपच वेदनादायक असते. प्रत्येकामध्ये 4 अक्कल दाढा असतात. जेव्हा ही निघते तेव्हा खूपच वेदना होते. या मुळे हिरड्यांमध्ये सूज येते. हे इतर मोलर्स ला देखील इजा करतो. ह्याचा उपाय म्हणजे अक्कल दाढ काढून टाकणेच योग्य आहे.
अक्कल दाढ काढून टाके पर्यंत होणाऱ्या वेदनेला कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आहे ज्यांना अवलंबवून आपण वेदनेला कमी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या.
 
 * कांद्याचा वापर- 
कांदा वेदना कमी करण्यासाठी तसेच सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. या मध्ये फायटोकेमिकल्स आढळतात जे अक्कल दाढीमध्ये असलेले जंताना दूर करतात. या साठी आपल्याला कच्चा कांदा चावावा लागेल. कांद्याचा तिखटपणा वेदनेला कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. जास्त वेदना असल्यास कांदा काही वेळ चावा नंतर ते थुंकून द्या. हे सूज आणि बेक्टेरिया कमी करण्यात मदत करेल.
 
* मिठाच्या पाण्याचे गुळणे-
मिठाच्या पाण्याचे गुळणे केल्याने देखील वेदने मध्ये आराम मिळतो. हे पाणी सूज कमी करून वेदनेला कमी करण्याचे काम करतो. या साठी एक कप कोमट पाण्यात एक चमचा  मीठ मिसळा आणि एक एक घोट घेऊन 30 सेकंद तोंडात फिरवा आणि थुंकून द्या. चांगले परिणाम मिळविण्यासाठी दिवसातून किमान 2-3 वेळा करा.    
 
* लवंगा चा वापर- 
दाताच्या वेदनेमध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या साहित्यांपैकी एक आहे लवंगा. हे त्वरितच वेदनेपासून सुटका मिळवतो .या मध्ये युजेनॉल नावाचे एक रसायन आहे, या मध्ये एंट्री-फंगल आणि एन्टी-इंफ्लेमेट्री गुणधर्म असतात. जे बेक्टेरिया दूर करण्यात मदत करतात. 
 
*लसणाचा वापर करा-
लसणाचा वापर केल्याने अक्कल दाढेच्या वेदनेपासून आराम मिळतो. लसणामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात.या मुळे दाताच्या कुठल्याही संसर्गापासून बचाव केला जाऊ शकतो. या मध्ये एलिसीन आढळते जे दाताच्या बेक्टेरिया आणि जंतांचा नायनाट करून दातांना निरोगी आणि बळकट करतात. अक्कल दाढेत वेदना जाणवत असल्यास लसणाची पाकळी दाताच्या खाली ठेवा. वेदना नाहीशी होईल. 
 
* हिंगाचा वापर - 
अक्कल दाढेच्या वेदनेत हिंग वापरल्याने वेदनेपासून मुक्ती मिळते. चिमूटभर हिंग लिंबू किंवा मोसंबीच्या रसात मिसळून कापसाच्या बोळ्याला अक्कल दाढेच्या ठिकाणी ठेवा. असं केल्याने त्वरितच वेदनेपासून आराम मिळेल. अक्कल दाढेच्या वेदनेत हिंग सर्वात प्रभावी मानले जाते. म्हणून आपण हिंगाचा वापर थेट वेदना असलेल्या जागी करू शकता. 
 
* आईस पॅक लावा-
सूज आणि वेदनेला कमी करण्यासाठी हिरड्यावर आईसपॅक लावल्याने वेदना आणि सूज कमी होते. हे बनविण्यासाठी एका कपड्यात काही बर्फाचे तुकडे घाला आणि चेहऱ्याच्या बाहेरच्या बाजूस ठेवा. असं केल्याने वेदनेपासून आराम मिळेल .