रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (09:15 IST)

घरचा वैद्य :पोटाच्या गॅसच्या त्रासाला बरे करतात हे घरगुती उपचार

आजच्या काळात वृद्धच नव्हे तर मुलं आणि तरुणांना देखील पोटाच्या गॅसचा त्रास होत आहे. वेळीच ह्यावर उपचार केले नाही तर अधिक त्रास उद्भवू शकतात. या साठी काही घरगुती उपचार आहे ज्यांना अवलंबवून गॅसच्या त्रासापासून सुटका मिळवू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
1 दालचिनी -
ही गॅसचा त्रास दूर करण्यात मदत करते. या साठी एक चमचा दालचिनीपूड कोमट पाण्यात मिसळून प्यावं. इच्छा असल्यास मध देखील घालू शकता.
 
2 आलं-
गॅसच्या त्रासापासून आराम मिळण्यासाठी आल्याचे सेवन करावं. या साठी आलं, शोप आणि वेलची सम प्रमाणात पाण्यात मिसळून  घ्या चिमूटभर हिंग घाला. दिवसातून एक दोन वेळा प्यायल्याने आराम मिळेल.  
 
3 लिंबू आणि बेकिंग सोडा-
गॅस च्या त्रासाला लिंबू आणि बेकिंग सोडा प्रभावी आहे. या साठी एक लिंबाच्या रसात बेकिंग सोडा घाला पाणी घाला घोळून हळू-हळू प्यावं. आपण एक ग्लास पाण्यात बेकिंग सोडा घालून देखील पिऊ शकता.
 
4  लसूण -
लसूण हे गॅसच्या त्रासात आराम देतात. या साठी आपण लसणाच्या काही पाकळ्या पाण्यात घालून उकळवून घ्या. या मध्ये काळी मिरपूड आणि जिरे मिसळा. गाळून थंड करून प्या. दिवसातून दोन ते तीन वेळा हे सेवन करा.  
 
5 हिंग -
गॅस असल्यास हिंगाचे पाणी प्यावं. हे करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. त्वरितच गॅसच्या त्रासापासून आराम मिळेल. हिंगाचे पाणी पिण्यास अडचण येत असेल तर हिंगाला पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट पोटावर चोळा. काहीच वेळात गॅसचा त्रास नाहीसा होईल.  
 
6 शोप -
गॅस चा त्रास असल्यास गरम पाण्यात शोप मिसळून प्यावं. या मुळे आराम मिळतो.