शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : सोमवार, 8 मार्च 2021 (12:42 IST)

घरचा वैद्य - डोकेदुखी,दात दुखी दूर करतील हे घरगुती उपचार

कामाच्या तणावामुळे आणि इतर कारणांमुळे शरीरात आणि डोक्यात वेदना होतें बरेच औषधे घेऊन देखील आराम पडत नाही, तर त्या वेदनाशामक गोळ्या खाल्ल्याने शरीरावर इजा होतें.शरीरात वेदना असल्यास काही घरगुती अवलंबवा जेणे करून शरीराला कोणतीही हानी होणार नाही आणि वेदनां पासून मुक्ती मिळते. चला तर मग हे घरगुती उपाय काय आहे जाणून घेऊ या. 
 
* लवंग- लवंग प्रत्येक घरात आढळते. दातदुखी एकाएकी उद्भवते. अशा परिस्थितीत औषधे मिळणे कठीण होतें. दातदुखी साठी लवंगाचे तेल फायदेशीर आहे. घरात लवंगाचे तेल नसल्यास, लवंगा दाताखाली दाबल्याने वेदना कमी होतें. घसा खवखवणे आणि घशात दुखण्यावर देखील लवंग प्रभावी आहे.
 
* काळा चहा किंवा ब्लॅक टी - कामाचा ताण आणि थकव्यामुळे होणाऱ्या वेदनेला कमी करण्यासाठी काळा चहा प्यावा. नंतर डोळे मिटून पडावे. डोकेदुखीपासून आराम मिळेल आणि थकवा दूर होईल. काळा चहा आवडत नसेल तर या चहा मध्ये दूध घालून प्यावे. 
 
* हळदीचे दूध -काम केल्यावर थकवा आणि कंटाळा आला असल्यास आणि या मुळे शरीरात वेदना जाणवत असल्यास वेदना शामक औषधे घेण्या ऐवजी हळद घालून कोमट दूध प्यावे. थोड्या वेळासाठी झोपा. उठल्यावर आपण ताजे तवाने व्हाल. आणि शरीरातील सर्व वेदना देखील दूर होतील. 

* तेल लावून चोळा-दिवसभर ऑफिसात एकाच ठिकाणी बसून राहिल्यावर पायांना त्रास होऊ लागतो. या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी पायांच्या तळांवर थोडं तेल लावा. हे वेदनेपासून आराम देईल आणि तळपायाच्या जळजळ पासून देखील आराम देईल, तसेच पायाची त्वचा देखील मऊ राहील. 

* तेलाने मॉलिश करा- एनिसीड ऑइल, लव्हेंडर तेल, लवंगाचे तेल, लेमन ग्रास तेल, हे सर्व तेल वेदनांपासून आराम देण्यात प्रभावी आहेत. शरीरात जडपणा, वेदना, पेटके जाणवत असल्यास या पैकी कोणत्याही तेलाने शरीराची मॉलिश केल्यावर स्नायूंना आराम मिळतो. या मुळे काहीच वेळात शरीराची वेदना दूर होतें.