सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (15:51 IST)

'हिचकी'चा त्रास आहे, हे उपाय करा

आपण देखील वारंवार हिचकी येण्याचा त्रासाने वैतागला आहात तर हे घरगुती उपायांना अवलंबवून या त्रासाला दूर करू शकतो. कोणी पाणी द्या ह्याला ! असे आपण बऱ्याच वेळा ऐकले असेलच की हा हिचकीने त्रासलेला आहे. बऱ्याच वेळा काही खाल्ल्यावर किंवा काही प्यायल्यावर हिचकी येऊ लागते, ज्यामुळे त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच वेळा मित्रां समोर देखील हिचकी येऊ लागते. तर खूप वाईट वाटते. तसे हिचकी न येण्याचे उपाय कमीच आहे. पण हिचकी आल्यावर त्याच्या त्रासाला सहजपणे दूर केले जाऊ शकते. हे काही सोपे उपाय आहेत ज्यांना अवलंबवून आपण हिचकी चुटकीशीर दूर करू शकतो.

* साखर - 
जेवताना हिचकी येणं सामान्य बाब आहे. आपल्या सह देखील असं घडत असेल तर साखरेच्या सेवन केल्यानं आपण ह्या त्रासाला काही मिनिटातच दूर करू शकता. या साठी हिचकी आल्यावर त्वरितच साखर खावी या मुळे हिचकी येणं थांबेल आणि चांगले वाटेल. हे एक घरगुती उपाय आहे. 
 
* लिंबू पाणी -
लिंबू पाणी देखील हिचकीच्या समस्या दूर करण्यासाठी एक प्रभावी आणि घरगुती उपाय आहे. या साठी आपण कोमट पाण्यात लिंबाच्या रसाला मिसळून त्याचे सेवन करावं. ह्याचे सेवन तेव्हाच करावं ज्यावेळी हिचकी अधिक प्रमाणात येत आहे. बऱ्याच वेळा घशात काही अडकल्यामुळे देखील हिचकी येते. बऱ्याच वेळा हे घशाला नुकसान देते. आपण साधारण पाण्यात देखील लिंबाच्या रसाला मिसळून सेवन करू शकता.
 
* मध - 
मध हे बऱ्याच रोगांसाठी रामबाण आहे. किरकोळ आजारासाठी ह्याला चांगले घरगुती औषध मानले आहे. पण ह्याचा वापर आपण हिचकी आल्यावर देखील करू शकता. या साठी आपण हिचकी आल्यावर कोमट पाण्यात एक ते दोन थेंब मध मिसळून सेवन करावं. या मुळे आपल्याला हिचकी पासून त्वरितच आराम मिळेल. आपण केवळ मधाचे सेवन देखील करू शकता. 
 
* बडीशेप - 
भारतीय जेवणात शोप बऱ्याच वर्षांपासून वापरली जात आहे. हे खाद्य पदार्थ चविष्ट बनविण्यासाठी बरेच घरगुती समस्यांसाठी प्रभावी उपाय आहे. हिचकी आल्यावर आपण शोप वापरू शकता. या साठी आपण एक चमचा शोप सह अर्धा चमचा साखर मिसळून कोमट पाण्यासह सेवन करावं. या घरगुती उपायामुळे हिचकी दूर होऊ शकते.