मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (14:24 IST)

Home Remedies For hiccough :उचकीचा त्रास होतो ,उचकी थांबवण्यासाठी हे 6 उपाय अवलंबवा

कोणालाही उचकी येणे खूप सामान्य आहे. कदाचित आपल्यापैकी कोणीही हिचकी येण्याची इतकी काळजी करत नसेल, पण हीच उचकी तुमच्यासाठी त्रासाचे कारण बनली तर काय? सहसा उचकी काही काळानंतर स्वतःहून बरी होते परंतु काहीवेळा ती दीर्घकाळ टिकून राहते. जरी उचकी ही गंभीर समस्या नसली तरी काही लोकांना याची खूप काळजी असते कारण काही लोकांना खूप उचकी येते. उचकी तुमच्या दैनंदिन कामात व्यत्यय आणू शकते. जाणून घेऊया उचकी येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय :- 
 
उचकी थांबवण्यासाठी कोणते उपाय आहेत?
 
1. उचकी थांबवण्यासाठी तुम्ही वेलची पावडर आणि कोमट पाणीचा  वापरू शकता. यासाठी तुम्हाला एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा वेलची पावडर टाकून उकळवा आणि 15 मिनिटांनी गाळून प्या.
 
उचकीपासून मुक्त होण्यासाठी  फक्त एक चमचा साखर हवी आहे. कदाचित यापेक्षा चांगला उपाय सापडणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त एक चमचा साखर घ्यायची आहे आणि ती हळूहळू चावून खावी लागेल. हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे.
 
3. तिसरा उपाय म्हणजे काळी मिरी. पण  ते खाण्याची गरज नाही तर काळी मिरी चा वास घ्या. असे केल्याने तुम्हाला लगेच शिंका येण्यास सुरुवात होईल कारण शिंका आल्याने उचकी शांत होऊ शकते.
 
4. चौथा उपाय म्हणजे दही! दही हा देखील उचकी थांबवण्याचा उत्तम उपाय आहे. उचकी झाल्यास,  एक चमचा दही खा, असं केल्याने उचकी लगेच थांबेल.
 
5. उचकी शांत करण्यासाठी आल्याचा तुकडा घ्या आणि हळू हळू चावा कारण आल्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात, जे उचकी दूर करण्यासोबतच अनेक समस्यांपासून देखील आराम देऊ शकतात.