तोंड, ओठ आणि दातांच्या रोगावर घरगुती उपाय

Last Modified सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (18:42 IST)
तोंडातील फोड/तोंड येणे/तोंडातले छाले

* तोंडात छाले झाल्यास ज्येष्ठमधाची काडी चघळावी.
* कथ्याबरोबर पेरुची पाने चावल्याने छाले बरे होतात.

* जिभेवर छाले झाल्यास एक केळ गाईच्या दुधाबरोबर खावे. काही दिवस घेतल्यास छाले बरे होतात.

हिरड्यांतून रक्त येणे :
* मीठ, हळद आणि तुरटी समप्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण करून घ्यावे. या चूर्णाने मंजन करावे. फार गार किंवा फार थंड पेय घेऊ नये.गाजर, सफरचंद, आवळा यासारखी फळे खावीत.

दात हलणे :
* तिळाच्या तेलात काळे मीठ वाटून हिरड्यांवर चोळल्याने दात हलायचे बंद होतात.

दात दुखणे :
* दात दुखल्यास थोडासा कापूर दुखणाऱ्या दाताखाली ठेवून दाबावे. दाढेत खड्डा असेल तर त्यात भरून घ्यावे. वेदना बंद होतील.

* दातदुखी असल्यास कच्च्या पपईचे दूध, थोडेस हिंग आणि कापूर मिसळून कापसाच्या बोळ्याला दुखणाऱ्या दाताखाली ठेवून दाबावे.

* लिंबाचा पाला घेऊन त्याचा रस ज्या बाजूची दाढ दुखत असेल त्या बाजूच्या कानात दोन थेंब टाकावे. लगेच आराम येतो.

पायरिया :
* आंब्याच्या कोयीच्या गराचे बारीक चूर्ण करून त्याने मंजन केल्याने पायरिया बरा होतो.

* लिंबाची फांदी पानांसकट सावलीत वाळवायवी आणि जाळून बारीक वाटून घ्यावी.त्यात काही लवंग, पिपरेंट आणि मीठ मिसळावे. सकाळ-सायंकाळ या चूर्णाने मंजन केल्याने पायरिया बरा होतो.

तोंडात किंवा श्वासात दुर्गंधी.
* जेवण झाल्यानंतर दोन्हीवेळा चमचाभर बडीशेप चघळल्याने तोंडाचा वास काही दिवसात जातो आणि पाचनक्रिया पण सुधारते.

* तुळशीची चार पाने रोज खाऊन वरून पाणी प्यायलाने तोंडाचा वास जातो.

* एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्या पाण्याने रोज सकाळी चुळ भरल्यास, तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.
जेवणानंतर एक लवंग चघळल्याने तोंडाचा वास जातो.

तोंडातली चव जाणे :
* एक लिंबू कापून त्याच्या अर्ध्या फोडीत दोन चिमूट काळे मीठ व मिरिपूड शिंपडून लिंबाला आगीत थोडे गरम करावे.नंतर तो लिंबू चोखल्याने जिभेचा कडवटपणा जाऊन जिभेला चव येते व अपचन आणि गॅसेस पण बरे होतात.

* तोंडात कडवटपणा असेल तर डाळिंबाची साल पाण्यात उकळवून त्यात थोडी बडीशेप टाकून चुळ भरावी .


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Relationship Advice: मुली अशा स्वभावाच्या मुलांपासून लांब ...

Relationship Advice: मुली अशा स्वभावाच्या मुलांपासून लांब राहणे पसंत करतात
Relationship Tips: मुलं निवडताना मुली अनेक गोष्टी लक्षात ठेवतात हे कदाचित मुलांना चांगलंच ...

जेव्हा बिरबलने केला स्वर्गाचा प्रवास

जेव्हा बिरबलने केला स्वर्गाचा प्रवास
एकदा बादशहा अकबर चे केस एक नाव्ही कापत होता. नाव्ही म्हणाला -''हुजूर आपण या राज्यात तर ...

Homemade lip balm नैसर्गिक गुलाबी ओठ मिळवा

Homemade lip balm नैसर्गिक गुलाबी ओठ मिळवा
होममेड लिप बाम साधा लिप बाम एक कंटेनर किंवा हीटप्रूफ कप घ्या आणि त्यात 1 चमचा मेण ...

हृदय निरोगी ठेवण्यासाठी Omega 3 युक्त पदार्थ खा, ओमेगा ३ चे ...

हृदय निरोगी ठेवण्यासाठी Omega 3 युक्त पदार्थ खा, ओमेगा ३ चे फायदे जाणून घ्या
ओमेगा-३ फायदे: निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. वाढत्या ...

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या गुळाचा चहा

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या गुळाचा चहा
हिवाळ्यात गुळाचा चहा तुमच्या रोजच्या चहाची चव तर वाढवतोच पण गुळाचा चहा पिण्याचे अनेक ...