जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
-स्वातंत्र्यवीर सावरकर
जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदेस्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांचीस्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांचीपरवशतेच्या नभात तूची आकाशी होसीस्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसीवंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीस्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लालीतू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूचीस्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेचीवंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांतीस्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदतीजे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते तेस्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होतेवंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रतेतुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरणतुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रतेवंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥