बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. आयपीएल लेख
Written By वेबदुनिया|

ग्रेग चॅपेल: 'राजस्थान रॉयल्स' संघाचे प्रशिक्षक

पूर्ण नाव: ग्रेग स्टीफन चॅपेल
जन्म: 7 ऑगस्ट 1948, मध्ये उनली (दक्षिण ऑस्‍ट्रे‍लियात) झाला होता.

ND
ग्रेग चॅपेल ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू होते. त्यांनी 1975 ते 1977 पर्यंत संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर त्यांनी ब्रेकअवे वर्ल्ड सिरीज संघाकडून क्रिकेट सामने खेळले. 1979 मध्ये पु्न्हा एकदा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार म्हणून पुनरागमन झाले. नंतर 1983 पर्यंत त्यांनी कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती.

ऑस्ट्रेलिया संघात त्यांचा भाऊ देखील होता. ते त्या काळातील शैलीदार खेळाडू होते. मध्यमगती गोलंदाजीही त्यांनी केली. क्रिकेटमधून निवृत्ती घेईपर्यंत त्यांच्या नावावर सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम आहे. 1984 मध्ये निवृत्ती घेण्यापूर्वी त्यांनी अनेक प्रकारचे व्यवसाय केले. उदाहरणार्थ. मीडियाची आवड असण्याचे कार्यक्रम तयार करणे, प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आवड होती. ते राष्ट्रीय टीम व क्विन्स टीमचे निवडकर्ता होते. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक पदही सांभाळले. 2007 मधील विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या खराब कामगिरी आणि त्यांच्या वैयक्तिक वादामुळे त्यांना प्रश‍िक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.