शनिवार, 26 एप्रिल 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

वेरी फास्ट... मेड इन जापान

WD
एक जापानी पर्यटक साईट सीईंगसाठी भारतात आला. शेवटच्या दिवशी सगळं पाहून झाल्यावर त्याने एका टॅक्सीला हात दाखवला आणि त्याला विमानतळावर घेवून जाण्यास सांगितले. टॅक्सी रोडवरुन धावत असतांना एक होंडा गाडी त्या टॅक्सीला ओव्हरटेक करुन गेली. त्या जापानी पर्यटकाने टॅक्सीच्या खिडकीतून आपलं डोकं बाहेर काढलं आणि ओरडायला लागला '' होंडा... वेरी फास्ट ... वेरी फास्ट... मेड इन जापान'

थोड्या वेळाने एक टोयाटा गाडी त्या टॅक्सीला ओव्हरटेक करुन गेली. पुन्हा त्या जापानी पर्यटकाने टॅक्सीच्या खिडकीतून आपलं डोकं बाहेर काढलं आणि ओरडायला लागला, '' टोयोटा... वेरी फास्ट... वेरी फास्ट... मेड इन जापान'

अजून थोड्या वेळाने एक मितसुबीशी गाडी त्या टॅक्सीला ओवरटेक करुन गेली. तो पर्यटक आता तिसऱ्यांदा टॅक्सीच्या खिडकीतून आपलं तोंड बाहेर काढून ओरडायला लागला, '' मितसुबीशी... वेरी फास्ट ..वेरी फास्ट.. मेड इन जापान''

आता मात्र टॅक्सीच्या ड्रायव्हरला त्या पर्यटकाचा राग यायला लागला होता पण तो काही न बोलता चूप बसून राहाला. असं पुढेही कोणती जापानी कार किंवा वस्तू दिसताच तो पर्यटक ओरडत राहाला. शेवटी टॅक्सी एअरपोर्टवर पोहोचली. ड्रायव्हरने गाडीचे भाडे सांगितले, '' 300 डॉलर्स''

जापनीज आश्चर्याने म्हणाला, '' 300 डॉलर्स... इट्स वेरी एक्सपेन्सीव... वेरी एक्सपेन्सीव''

त्यावर तो ड्रायव्हर त्या पर्यटकाची नक्कल करीत म्हणाला, '' टॅक्सी मिटर... वेरी फास्ट .. वेरी फास्ट ... मेड इन जापान''.