असा आमचा युवराज खरंच बाई भोळा
मग मारला डोळा
असा आमचा युवराज
खरंच बाई भोळा
अविश्वास ठरावाचे
गांभीर्य टाकले घालवून
करायचे तरी काय
बुडणारा पक्ष चालवून
लोकांची झाली करमणूक
संसदेत हास्याचे स्फोट
अनुभवहीन नेतृत्वाच्या
पदरात नेहमीच खोट
सगळे उपाय करून थकले
थायलंडला कितीदा धाडायचे
इथे येऊन स्वपक्षालाच
तोंडघशी पाडायचे?
पन्नाशीला आलास बाबा
समज कधी यायची
सांग पाहू सगळी राज्ये
'हाता'त कशी घ्यायची?
----'-------------------------
मुरारी देशपांडे