शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (19:01 IST)

तुला पाहिजे ती भाजी घे आणि घरी जा.

कविताने आपल्या नवऱ्याला मेसेज केला :- अॉफीस वरून येतान भाजी घेऊन या... आणि सुजाताने तुम्हाला हाय म्हंटले आहे.
रवि (नवरा) :- हि सुजाता कोण
कविता :- कोणी नाही, फक्त बघितलं तुम्ही माझा मेसेज वाचलात की नाही
रवि :- तसं नाही, माझ्या बरोबर सुजाता आहे आणि तु कोणत्या सुजाता बद्दल बोलतेस म्हणून म्हंटलं
कविता :- अं... आत्ता तुम्ही कुठं आहात आणि ही सुजाता कोण..
रवि :- ही माझ्या अॅॉफिस मधील आहे आणि मी भाजी मंडईत आहे.
कविता : थांबा मी आलेच
 
थोड्या वेळाने
कविता :- कुठे आहात मी आलेय...
रवि :- मी अॉफीस मध्येच आहे आता तुला पाहिजे ती भाजी घे आणि घरी जा.