रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2012
Written By वेबदुनिया|

छायाकल्प चंद्रग्रहण किंवा मांद्य चंद्रग्रहण!

WD
कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवतीच्या विरळ छायेमध्ये आल्याने बुधवार, 28 नोव्हेंबर रोजी छालाकल्प चंद्रग्रहण होणार असून, हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचे ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

या दिवशी चंद्र पूर्व क्षितीजाखाली असताना 5.45 वाजात पृथ्वीच्या विरळ छायेत येण्यास प्रारंभ होईल. मुंबईत सायंकाळी 5.51 ‍वाजता ग्रहणात चंद्र उगवेल. रात्री 10.21ला तो पृथ्वीच्या विरळछायेतून बाहेर पडेल. या चंद्रग्रहणाला मांद्य चंद्रग्रहण असेही म्हणतात. नेहमीच्या चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत आल्याने कासर तपकिरी दिसतो. परंतु, छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र फक्त ग्लान-कमी तेजस्वी दिसतो. छायाकल्प चंद्रग्रहणात ग्रहणविषयक धार्मिक नियम पाळावयाचे नसतात, असे सोमण म्हणाले. या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमाही साजरी करता येईल.