मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

लाखो जोडप्यांना हवाय ११-१२-१३ चा मुहूर्त

WD
११/१२/१३ तारखेचा योग साधून जगभरात लाखो जोडपी विवाहबंधनात अडकण्यास उत्सुक आहेत. ही एक खास तारीख मानली जाते. त्यामुळे जगभरातील अनेक जोडप्यांना या दिवशी लग्न करण्याची इच्छा आहे. नुसत्या अमेरिकेत या दिवशी लग्न करण्यासाठी २,२६५ जोडप्यांनी नाव नोंदणी केली आहे.

११/१२/१३ या अद्भूत तारखेचा मुहूर्त साधता यावा, यासाठी अनेक महिन्यांपासून तयारी सुरू आहे. संख्याशास्त्रानुसार एका सिक्वेन्समध्ये येणारे अंक असणारी तारीख किंवा समान अंक असणारी तारीख सौभाग्य देणारी असते. ११/१२/१३ असा योग नेहमी येत नसतो. ज्यांचा यादिवशी जन्म झाला आहे, अशी बालकेही भाग्यवान मानली जातात. न्यूयॉर्क डेली न्यूजच्या अहवालानुसार, आज २०१२ साली झालेल्या विवाहांपेक्षा ७२२ टक्के नफा झाला आहे. अंकज्योतिषानुसार अशा तारखा सौभाग्य देणा-या असल्या, तरी ज्योतिषशास्त्रात अशा दिनांकांबद्दल कुठलेही मिथक जोडलेले नाही.