मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

साप्ताहिक राशीभविष्यफल (22.09.2013)

WD

मेष : आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल.व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील, आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्‍वास व कामाचा वेग वाढेल. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य लाभेल.आपली जिद्द व महत्त्वाकांक्षा यामुळे आपले ध्येय गाठणे सहज शक्य होईल. उत्तरार्धात आपला वैयक्तीक उत्कर्ष साधता येईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल.मित्रपरीवाराच्या सहकार्याने एखादे रेंगाळलेले काम मार्गी लागेल.


WD

वृषभ : दूरचे प्रवास घडून येतील. आनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल.विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील.उधारी उसनवारी वसूल होईल. अनपेक्षित धनलाभ झाल्याने आश्‍चर्याचा धक्का बसेल. एखादी महत्वाची बातमी समजल्याने उत्साही बनाल.व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करु शकाल. अपेक्षित गाठीभेटी झाल्याने मन प्रसन्न होईल. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका.

WD

मिथुन : एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकाराल. जनसंपर्कातून लाभ होतील. ज्या बातमीची अगदी आतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल. आपल्या वृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. आपले ध्येय साध्य करता येईल. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. भावंडातील रुसवे फुगवे दूर होऊन सलोख्याचे संबंध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.


WD

कर्क : जुनी थकेलेली येणी वसूल होतील. कुटुंबात सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागणार आहे. आकर्षक खरेदी कराल. मोठय़ा उत्साहाने आपली कामे कराल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन खरेदीचे मनसुबे महिला आखतील. गृहसौख्याचा आनंद लुटाल. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील, एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. आपल्या मताशी ठाम राहीलात तर परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे जाईल. गुंतवणूकीतून लाभ होतील.


WD

सिंह : धाडसी निर्णय घेतले जातील. मह्त्वाच्या विषयांवर भावंडांशी सुसंवाद साधून त्यांचा सल्ला ग्राह्य मानाल. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. जोडदंद्यातून लाभ होतील. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निव.ड झाल्यामुळे परगावी जाण्याचे योग येतील. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. संततीच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल.


WD

कन्या : नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. घरातील दुर्लक्षित कामासाठी वेळ देता येईल. मित्र परिवाराची भेट होईल. मिष्टान्न भोजनाचे बेत पार पडतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. राशीतील शुक्र आपल्या मनोकामना पूर्ण करेल. कामानिमित्त दूरवर प्रवास घडून येतील. प्रियव्यक्तीच्या सहाय्याने व्यवसायात भरभराट घडवून आणेल. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल. पूर्वीच्या मिळालेल्या कामतील ऑर्डर्स वाढविल्या जातील. आपल्या अधिकार कक्षेत वाढ होऊन एखादी सवलत मिळेल. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे.

WD

तूळ : आपल्याला मताचा समाजात आदर होईल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. राशीतील रवि, बुधामुळे स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील. आध्यत्मिक ओढा वाढेल. आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल.आपली आजवर रेंगाळलेली कामे प्रतिष्ठित व्यकिं्तच्या सहकार्याने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.


WD

वृश्चिक : हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. आपल्या जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. उत्तरार्धात कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांत विश्‍वास निर्माण करेल.


WD

धनू : जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे. सूचक स्वप्ने पडतील. प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. व्यावसायिक भाग्य बीजे पेरली जातील. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. नेत्रविकार, उष्णतेचे विकार, पित्तविकार यांच्यापासून त्रास होण्याची शक्यता आहे. परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. जून्या मिळालेल्या ऑर्डर्समध्ये वाढ झाल्यामुळे कामाचा विस्तार होईल.

WD

मकर : अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तींच्या ओळखीतून कामात नुकसान संभवते. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. नव्या उमेदीने कामाचा ध्यास घ्याल. कामानिमित्त परदेश प्रवास घडून येतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. सुखस्थानातील रवि, बुधामुळे कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. वाहन-वास्तूचे योग येतील. आपले ध्येय साध्य करता येईल. आध्यत्मिक ओढा वाढेल.


WD

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. दूरचे प्रवास घडून येतील. तरुणांना नोकरीत सुसंधी लाभतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नोकरीतही अनपेक्षित चांगला बदल झाल्याने समाधान लाभेल. अधिकारावर असणार्‍या स्त्री व्यक्तीकडून आपले लांबलेले काम होईल. अनावश्यक खर्च उद्भवतील. आपली बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळेच आपल्या मतांचा आदर केला जाईल. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद लुटाल. सार्वजनिक कामात यश मिळेल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल.


WD

मीन : प्रतिष्ठीत व्यक्तींच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. व्यवसाय उद्योगात सहकार्‍यांची साथ लाभेल. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल.नोकरीत अधिकार प्राप्ती होईल. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकाराल. पूर्वनियोजित कार्यक्रमात काही कारणाने बदल करावे लागतील. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातून प्रगती साधता येईल. मौन धारण करुन कार्यसिद्धी साधणे उत्तम. कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वत:चे काम स्वत:च करावे.