पावसामुळे नदीला मोठा पूर आला होता. या वेळी मात्र दिगू पूर्ण तयारीनिशी नदीवर गेला. त्याच्या सुदैवाने गुरूजींचा लहान मुलगा नदीच्या पुरात पडला आणि पुरात वाहू लागला. 'वाचवा, वाचवा! मुलाला वाचवा. पुरात वाहतोय हो तो....' मुलाची आई गुरूजीणबाई ओरडू लागल्या. दिगूने धाडदिशी पुराच्या पाण्यात उडी ठोकली. आणि जीव धोक्यात घालून मुलाला वाचवून काठावर आणले. दिगूने त्याला गुरूजीणबाईंच्या ताब्यात दिले व म्हणाला, ' बाई! हा घ्या तुमचा मुलगा आणि ही घ्या मी मुद्दाम घरून आणलेली टोपी. टोपी पाण्यात बुडाली म्हणून मागच्याप्रमाणे या वेळी मी तुम्हाला बोल लावू देणार नाही!' बाई ओरडली, 'अरे! ठेव ती टोपी तुझ्याजवळच. पुरात बुडताना मुलाच्या हातात मोबाईल होता. मेल्या! मी मोबाईल गमावला तुझ्यामुळे. मोबाईल भरून दे मला.