आस्था दीपक
सौ. स्वाती दांडेकर
आस्था दीपक लावतेमन मंदिरी हे गजाननासदैव तेवत राहो हीज्योत विश्वासाचीउजेड पसरो विद्येचाह्या भूवारीशुद्ध राहू दे अंत:करणं माझेजीवन राहो सदैव निर्मळघेऊनी संगे गोडी, जशी दूध साखर नैवेद्याचीप्रसाद, सहयोगाचा, मदतीचा वाटू मीतुझ्या आशीर्वादाच्या सावलीत राहू मीदे आशिष देवा मजलाघडो सदैव जन कल्याण हातुनी माझ्यादे माझ्या भक्तीला शक्तीदेवा हेच मागणे मागते शेवटी