शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

चेष्टा

- विष्णु साठे

देवाला आली चेष्टेची लहर
एक दिवस त्याने केलाच कहर
WD
सिंह बनला गोगलगाय
उंदीर धरतो मांजराचे पाय
व्यायामशाळा काढतो कुत्रा
पद यात्रेला हत्तींची जत्रा
वाघाला भरला 'फ्यु'चा ता
हळूच थर्मामिटर लावतो साप
माकडाने काढला इंग्रजीचा क्लास
जिराफ आणि झेब्रा हटकून पास
हुरळून गेले गाढव सुस्
बायकोला म्हणे 'नाचतेस मस्त'.