शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

नवा मित्र

सायली नानासाहेब घोडके

ND
चला सवंगड्यांनो शब्दांच्या दुनियेत
जणू रंगांची उधळण
जशी शब्दांची उधळणं
चला सवंगड्याने
शब्दांच्या दुनियेत
जीवन ज्यांनी फुलवलं आमचं
त्या शब्दांना प्रणाम
चला सवंगड्यांनो
शब्दांच्या दुनियेत
ही कविता, गाणी, गप्पा, गोष्टी
सजल्या आहेत शब्दांनी
चला सवंगड्यांनो
शब्दांच्या दुनियेत
शब्दांची मैत्री पक्की ठेवा
रुसू नका बरे त्यांच्यावर
चला सवंगड्यांनो
शब्दांच्या दुनियेत
मित्र चालला म्हणून जाऊ नका बरे
आपण जायचं फक्त
शब्दांच्या मार्गाने
चला सवंगड्यांनो
शब्दांच्या दुनियेत.