मासा
श्रीमती वसुधा दुनाखे
मासेभाऊ मासेभाऊ कसा राहतो पाण्याततुम्हार लाभले नाना आकार, अन दिसता नाना रंगात।।चपळ हालचाली तुमच्या, पाण्यात न बुडतापाण्यामध्येच राहून श्वास कसा घेता।।तुमचं आपलं बरं आहे, ना शाळा ना अभ्यासहे आणा ते आणा कशाचाच नाही पाठी त्रास।।मग तुम्ही खाता काय, का नुसता पाणीच पितातरीही पाण्यामध्ये तुम्ही किती कसरती करता।।पाण्यातच झोप तरी कधी व केव्हा घेता का खाद्य शोधण्यातच सारा वेळ घालवता।।साभार : अनुपुष्प पुस्तक