शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (18:14 IST)

World Elephant Day 2021: सगळ्यात बुद्धिमान प्राणी हा

सगळ्यात बुद्धिमान प्राणी हा आहे,
सगळ्यात मोठ्ठाही तोच तर आहे,
एवढा सामर्थ्यवान पण आहे शाकाहारी,
सुंदर सुळ्यासाठी त्याची शिकार करतात शिकारी,
लहान दोस्तांचा हा आहे मोठ्ठा दोस्त,
जंगल सफारी ची त्यावर असते भिस्त,
पाय एवढे मजबूत पण त्यात नाही हाड,
सोंडेने उचलतो तो अख्ख च्या अक्ख झाड,
असा हा गुणवान हत्ती मित्र आहे सर्वांचा,
कुठं ही काम असो कामात पडतो सर्वांच्या!
....अश्विनी थत्ते