शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

झिम्मा फुगडी खेळूया

-महादेव कोरे

WD
आला आला पाऊस
नको घरी राहूस
पावसात भिजूया
झिम्मा फुगडी खेळूया
गार गार वार्‍यात
रेशमाच्या धारेत
पाण्यात होडी सोडूया
झिम्मा फुगडी खेळूया
क्षणात वीज कडाडेल
ढगात पडघम वाजेल
यारे या सारे या
झिम्मा फुगडी खेळूया
निळ्या निळ्या आकाशात
इंद्रधनूची कमान
मिळून सारे पाहू या
झिम्मा फुगडी खेळूय

साभार : वार्षिक अनुपुष्प दिवाळी विशेषांक 08