शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

बाहुलीचे लग्न

WD
आला उन्हाळा आला,येई आंब्याचा मोसम
रोज घाई गोंधळ, सुरू लग्नाचा मोसम

आमच्याही बाहुलीचे, ठरले आज लग्न
आधीच बांधली पूजा, यायला नको विघ्

नवरीबाई सेजल, सजली मोठी छान
स्वप्नात झाली गुंग, नह्वते जगाचे भान

नवरदेव किरण, तेच त्याचे पसरे
वर्हाडीही आहेत, गोड गोड साजरे

WDWD
वरूण, निरज, आदित्य, कुश, कुणाल, राहुल,
राधिका न सई, जुई बेबी गौरी न आंचल

सगळे झाले गोळा, हौसेला नाही मोल
लग्नाची धावाधाव, एकी त्यांची अमोल

सगळे आहेत हौसी, हौस करती लटकी
पण नवरी सेजल, आहे थोटी नकटी.