श्रावण भाज्या
- चंद्रकांत सोनवणे
श्रावण महिना आला आलापालेभाज्या घेऊ चला श्रावणीघेवड्याला मान देऊ चलामेथी म्हणते शेपुली नंबर माझापहिला आला ।।1।।पालकाची हो घाई अशी गवार मागे राहिल कशीभेंडीशी भांडेल कोण ते?करूनि भोपळा घाई अशी ।।2।।कडवट लागे फार कारले?स्पर्धा त्यासी करी दोडके चवळी पडवळा बहीण भाऊढोबळी मिरची तळुन खाऊ।।3।।कोथिंबीरीच्या वड्या करूअंबाडी लवणांत भरूफुलवर कोबी वजनच फारभरली वांगी अति चवदार.