शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

बोध कथा : 'गर्व हरण'

एका गावात एक सुतार राहायचा तो फार गरीब होता. आपल्या गरिबीला कंटाळून तो ते गाव सोडून दुसऱ्या गावाकडे जाण्यास निघाला. वाटेत चालताना त्याला एक अरण्य लागले. त्यांनी बघितले की एक मादी उंट बाळंतपणाने विव्हळत होती. तिच्या त्रासाला बघून त्याला तिची फार दया आली. तेवढ्यात त्या मादी उंट ने एका पिल्ल्याला जन्म दिले. तो सुतार तिच्या मुलाला आणि तिला आपल्या घरात घेऊन आला आणि तिचा छान सांभाळ केला. तिच्यासाठी कोळे पानं खाण्यासाठी आणले. काहीच दिवसात ती मादी उंट धडधाकट झाली. तो उंटांचा पिल्लू देखील गुटगुटीत झाला. 
 
त्या सुताराने त्याच्या गळ्यात एक छान घंटाळी बांधली. जेणे करून तो कोठे ही जाऊ नये. त्या मादी उंटाच्या दुधाला पिऊन त्या सुताराचा मुलं वाढत होते. त्याने तिचे दूध विक्रीसाठी देखील वापरले. त्याशिवाय तो ओझं उचलण्यासाठी देखील त्या उंटांचा वापर करत असे. हळू-हळू करून त्याने एका उंटा पासून बरेच उंट केले. असे करून त्याने आपल्या दुधाच्या व्यवसायाला वाढवून बरेच पैसे कमाविले. इथे त्याचा कडे बरेच उंट झाल्यामुळे ज्याचा गळ्यात घंटाळी होती तो उंट स्वतःला फार श्रेष्ठ समजायचा आणि मोठ्या रुबाबात राहायचा. त्याला सगळ्यांनी समजावले की तू आपल्या गळ्यातली घंटाळी काढून टाक तरी ही तो कोणाचे ऐकत नसे. त्याचा घंटाळीच्या आवाजावरून देखील सिंहाला कळायचे ती तो कोठे आहे. 
 
एके दिवशी तो उंट फिरत फिरत अरण्यात निघून जातो. त्याचा घंटाळीचा आवाज ऐकून सिंह त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला ठार मारतो. त्या उंटाने कोणाचे ऐकले नाही म्हणून त्याला आपले प्राण गमवावे लागले.