रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (10:12 IST)

Kids Story 'मूर्ख मित्र'

एक राजा होता त्याची मैत्री एक माकडाशी होती. त्याने त्या माकडाला आपल्या राज वाड्यात पहारेकरी म्हणून नेमणूक केली. त्याला त्या माकडावर खूप विश्वास होता. तो राजा बरोबर सावली प्रमाणे राहत असे. त्या राजेचे इतर सभासद राजाला समजवायचे की महाराज आपण या माकड वर एवढा विश्वास ते नका हे आपल्यासाठी घातक होऊ शकतं. तरी ही तो इतरांचे म्हणणे उडवून लावायचा. 
 
एके दिवशी राजा निजलेला असताना, माकड त्याला पंख्याने वार करत असताना, त्याने बघितले की एक माशी कुठून तरी येऊन त्या राजाच्या नाकावर बसत आहे. त्याने त्या माशीला हकलविण्याचा प्रयत्न केला. तरी ही ती माशी पुन्हा-पुन्हा उडून परत त्या राजाच्या नाकवर येऊन बसायची. वारंवार तिला घालविण्याचा प्रयत्न करून देखील ती गेली नाही तर त्या माकडाला तिचा फार राग आला आणि तिने त्या माशीला ठार मारण्यासाठी राजाची तलवार हातात घेउन त्या माशीला मारण्यासाठी तलवार उचलली तर काय, माशी तर उडून गेली पण त्या तलवारीने राजाचे तुकडे झाले आणि तो ठार मारला गेला. 
 
मूर्खावर अति विश्वासामुळे राजाला आपले प्राण गमवावे लागले.