रविवार, 15 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (11:29 IST)

बोध कथा : जश्यास तशे

एके ठिकाणी रामधन नावाचा वाणीचा मुलगा राहत असे. त्याने पैसे कमविण्यासाठी परदेशात जाण्याचा विचार केला. त्याकडे काही फार संपत्ती नसे, होती ती फक्त एक लोखंडी तूळ आणि ती देखील मण भर. त्यांनी जाण्याच्या पूर्वी ती लोखंडी तूळ एका सावकाराकडे तारण ठेवण्याचा विचार करून ठेवली. 
 
परदेशात निघून गेला. तिथून त्याने बरेच पैसे कमावून आणले. आल्यावर तो त्या सावकाराकडे आपले लोखंडी तूळ घेण्यास गेला आणि त्याने ती तूळ मागितली. त्या सावकाराच्या मनात चोर शिरला होता. त्याने रामधनाला उत्तर दिले की तुझी तूळ तर उंदरांनी खाऊन टाकली आहे. आता ती माझ्या कडे नाही. वाणाच्या मुलाला कळले की या सावकाराच्या मनात खोट आहे आणि त्याला ती तूळ काही द्यावीशी वाटत नाही. त्याने विचार केला आणि तो सावकाराला म्हणाला-' असू द्या, त्यात आपली काहीच चूक नाही ती तूळ तर उंदरांनी खालली आहे. त्यात आपले काय दोष. आपण काहीही काळजी करू नका.' 
 
काही वेळा नंतर त्याने त्या सावकाराला म्हटले की 'मित्रा मी जरा नदीवर जाऊन स्नान करून येतो. असे कर की तू तुझ्या मुलाला देखील माझ्या सोबत पाठवून दे. तो देखील स्नान करून येईल. वाण्याचा मुलगा फार छान आहे हे सावकाराला माहित होते. त्यांनी आपल्या मुलाला त्याचा सोबत पाठवून दिले. रामधनाने सावकाराच्या मुलाला एका गुहेत जाऊन डाम्बवून ठेवले आणि त्या गुहेच्या बाहेर एक मोठा दगड लावून त्या गुहेचे तोंड बंद करून दिले जेणे करून तो पळू शकणार नाही. 
 
रामधन परत सावकाराकडे येतो. सावकार त्याला विचारतो की तू माझ्या मुलास घेऊन गेला होतास कुठे आहे तो आणि तू एकटाच कसा काय आलास? कुठे आहे तो? 
 
रामधन म्हणाला - की अरे मित्रा आम्ही परत येत असतांना त्याला गरुडाने उचलून नेले.
 
सावकार म्हणाला की - हे कसं काय शक्य आहे ? एवढ्या मोठ्या मुलाला गरुड कसं काय नेऊ शकतो.
 
रामधन म्हणाला - अरे मित्रा जर कां मोठ्या मुलाला गरुड नेऊ शकत नाही तर एवढ्या मण भर लोखंडी तुळाला उंदीर कसं काय खाऊ शकतात. तुला तुझा मुलगा हवा असल्यास मला माझे तूळ दे. 
 
अश्या प्रकारे हा वाद राजाकडे जातो. राजा समोर सावकार रडत रडत म्हणतो की या रामधनाने माझ्या मुलाला चोरले आहे. 
 
राजा म्हणाले - रामधन ह्याचा मुलगा याला परत दे. 
रामधन म्हणाला की महाराज ह्याचा मुलगा माझ्याकडे नाही त्याला तर गरुडाने उचलून नेले आहे.
 
राजा - कसं काय, हे कसं शक्य आहे? गरुड कसा काय मुलाला नेउ शकतो?
 
रामधन - महाराज हे तसेच शक्य आहे ज्याप्रमाणे माझ्या मण भर लोखंडी तुळाला उंदीर खाऊ शकतात. मग रामधन ने सर्व घडलेले राजाला सांगितले. राजाने सावकाराला रंगवले आणि परत असं ना करण्याची तंबी दिली. आणि रामधनला हसत म्हणाले की तू 'जश्यास तसे दिले'.