मंगळवार, 8 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 एप्रिल 2025 (20:30 IST)

नैतिक कथा : मूर्ख गाढव

kids story
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याश्या गावात एक मीठ विक्रेता राहायचा. तो दररोज त्याच्या गाढवाच्या पाठीवर मीठाची पिशवी ठेऊन बाजारात घेऊन जात असे. वाटेत त्यांना एक नाला ओलांडायचा होता. एके दिवशी गाढव अचानक ओढ्यात पडले आणि मिठाची पिशवीही पाण्यात पडली. मीठ पाण्यात विरघळले आणि त्यामुळे पाशवी वाहून नेण्यास खूप हलकी झाली. यामुळे गाढव आनंदी झाले होते कारण त्याच्या पाठीवरचा भर कमी झाला होता.
मग गाढवाने रोज तीच युक्ती करायला सुरुवात केली. रोज बाजारात जाताना गाढव मुद्दाम नाल्यामध्ये पडत असे. ज्यामुळे सर्व मीठ पाण्यामध्ये वाहून जात होते. पण यामुळे आता मात्र मीठ विक्रेत्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. तसेच त्याने विचार केला तर त्याला समजले की गाढव मुद्दाम असे वागत आहे. मीठ विक्रेत्याला युक्ती समजली आणि त्याने त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी त्याने गाढवावर कापसाची पोती बांधली.
आता मात्र गाढवाला हे माहिती न्हवते की, आपल्या मालकाने आपल्या पाठीवर कापसाची पोती बांधली आहे. पुन्हा एकदा त्याने तीच युक्ती खेळली, व नाल्यामध्ये पडला. पण सर्व उलट झाले. कापूस व्हून गेला नाही तर तो पाणी भरल्यामुळे आणखीन जड झाला. ओला कापूस वाहून नेणे कठीण झाले आणि गाढवाचे नुकसान झाले. त्यातून धडा मिळाला. त्या दिवसानंतर तो पुन्हा असे वागला नाही. आता मीठ विक्रेत्याला देखील आनंद झाला.  
तात्पर्य- नशीब नेहमीच साथ देत नाही. त्यामुळे नेहमी प्रामाणिक असावे.
 ALSO READ: लघु कथा : जंगलाचा राजा
Edited By- Dhanashri Naik