1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: बुधवार, 26 मार्च 2025 (20:30 IST)

जातक कथा: बुद्धिमान माकडाची गोष्ट

Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलात एक बुद्धिमान माकड राहत होता. तसेच तो माकडांचा राजा देखील होता. एकदा काय झाले सर्व माकडे उद्या मारीत मारीत अशा ठिकाणी पोहचले जिथे काहीच न्हवते. आता सर्व माकडांना तहान लागली होती. पाण्यावाचून सर्व माकडे व्याकुळ झाली होती. 
शोध घेतल्यानंतर त्यांना एक तलाव सापडला. आता सर्व माकडांना खूप आनंद झाला सर्व माकडे त्या तलावात उडी मारणार तेवढ्यात त्यांच्या राजाने त्यांना थांबवले व म्हणाला की, थांबा आपल्याला या नवीन जागेची माहिती नाही. आता माकडांच्या राजाने काही माकडांना सोबत घेऊन त्या तलावाची पाहणी केली. काही अंतरावर त्याला पावलांचे ठसे दिसले. बुद्धिमान माकडाने लगेच असा निष्कर्ष काढला की त्या तलावात नक्कीच काही धोकादायक राक्षसासारखा प्राणी राहतो. आता तलावात एक राक्षस राहत असल्याची माहिती मिळताच सर्व माकडे हताश झाले. मग त्या हुशार माकडाने त्यांना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की ते अजूनही राक्षसाच्या तलावातून ते त्यांची तहान भागवू शकतात कारण तलावाभोवती उसाचे जंगल होते, जे ते तोडून त्याच्या त्यामधून घोटून पाणी पिऊ शकतात. सर्व माकडांनीही तसेच केले आणि त्यांची तहान भागवली. आता मात्र तलावातील राक्षस त्यांना पाहत राहिला. तसेच तहान भागवल्यानंतर, सर्व माकडे त्यांच्या जंगलात परतली. 
तात्पर्य : योग्य वेळी सावध झाल्यास संकटाना चातुर्याने परतवून लावता येते 
Edited By- Dhanashri Naik