शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जानेवारी 2025 (20:30 IST)

नैतिक कथा : हुशार कोंबड्याची गोष्ट

Kids story
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलात एका झाडावर एक कोंबडा राहायचा. तो रोज सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठायचा. तसेच उठल्यानंतर तो चारा शोधण्यासाठी जंगलात जायचा. तसेच संध्याकाळ होण्याआधी परत यायचा. त्याच जंगलात एक धूर्त कोल्हा देखील राहत होता. तो रोज कोंबड्याला पाहायचा आणि विचार करायचा की, “किती मोठा कोंबडा आहे. जर मला हा मिळाला तर मला याच स्वादिष्ट मांस खाता येईल. पण कोंबडा त्या कोल्ह्यच्या हाती लागायचा नाही.
एके दिवशी कोल्ह्याने कोंबडा पकडण्यासाठी एक युक्ती शोधून काढली. तो कोंबडा राहत असलेल्या झाडाजवळ गेले आणि म्हणाला,अरे कोंबड दादा तुम्हाला काही चांगली बातमी मिळाली का? जंगलाचा राजा आणि आमच्या वडिलांनी मिळून सर्व भांडणे संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून कोणताही प्राणी दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला इजा करणार नाही. त्यामुळे तू खाली ये. चला एकमेकांना मिठी मारूया आणि एकमेकांचे अभिनंदन करूया. कोल्ह्याकडून हे ऐकून कोंबडा त्याच्याकडे पाहून हसत म्हणाला, “अरे व्वा कोल्हे दादा ही, ही खूप चांगली बातमी आहे. मागे वळून पहा, कदाचित म्हणूनच आमचे काही इतर मित्रही आम्हाला भेटायला येत असतील." कोल्ह्याने आश्चर्याने विचारले, “मित्र? कोणता मित्र?" कोंबडा म्हणाला, "अरे शिकारी कुत्रे, ते आता आपले मित्रही आहे ना?" कुत्र्यांची नावे ऐकताच, कोल्ह्याने भीती वाटली व त्याने आला त्या दिशेनेच तो पळून गेला.  या वर आता कोंबडा हसला आणि कोल्ह्याला म्हणाला, “अरे, अरे कोल्हा, तू कुठे पळत आहेस? आता आपण सगळे मित्र आहोत ना?" “हो, हो, ते मित्र आहे, पण कदाचित शिकारी कुत्र्यांना अजून ही बातमी मिळाली नसेल”, असे म्हणत कोल्हा तिथून पळून गेला आणि कोंबड्याच्या हुशारीमुळे त्याचा जीव वाचला.
तात्पर्य : कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवू नये आणि धूर्त लोकांपासून नेहमी सावध राहिले पाहिजे.

Edited By- Dhanashri Naik