शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

पंचतंत्र कहाणी - सिंह आणि अस्वल

kids story
श्याम नावाच्या एका जंगलात एक सिंह राहत होता. तो सिंह खूपच चतुर होता. तो प्रत्येक प्राण्यासोबत मैत्री करायचा आणि त्यांचा फायदा करून घ्यायचा. सिंह हा सर्वांकडून काम करून घ्यायचा आणि कोणी मदत मागितली तर त्याला पाठ दाखवयचा. जंगलात सर्वांना महित झाले होते की, सिंह सर्वांशी स्वार्थासाठी मैत्री करत आहे आणि दुसऱ्यांची मदत करत नाही. आता सर्व प्राणी त्या सिंह पासून दूर राहायला लागले. मग जंगलात मित्रांच्या शोधात फिरता फिरता वेळ निघून गेली पण त्याला कोणीच मित्र भेटले नाही.
 
एक दिवस तो जेव्हा त्याच्या गुफेमध्ये जात होता. तर त्याने पाहिले की एक म्हातारे अस्वल त्याच्या गुफेजवळ घर करून राहत आहे. मग त्याच्या मनात आले की अस्वल सोबत आपण मैत्री करूया त्याच्या फायदा घेऊ या. रोज सिंह हा विचार करायचा की अस्वलाशी कसे बोलावे. दोन तीन दिवस निघून गेलेत. पण त्याला अस्वलाशी बोलायचे काही कारण मिळालेच नाही. एक दिवस त्याने पाहिले की अस्वल तर म्हातारे आहे. तो स्वताशीश बोलला की अस्वल तर म्हातारे आहे. त्याच्या मनात आले की हे म्हातारे अस्वल माझ्या काय मदतीस येईल. ही मैत्री करण्याचा काही फायदा नाही. एक दिवस सिंहने अस्वलाला चिमणी सोबत बोलतांना ऐकले . चिमणी, अस्वलाला विचारत होती की  “तुम्ही एवढे म्हातारे झाला आहात तुम्ही जेवणाची व्यवस्था कशी करतात. अस्वल चिमणीला म्हणाले की, पहिले मी मासे पकडून खायचो पण आता नाही खात याचा असा अर्थ नाही की मी उपाशी राहतो. आता मी मध खातो त्याची चव खूप छान लागते. याकरिता मला घनदाट जंगलात जावे लागते आणि मधमाश्यांकडून मध घ्यावे लागते. ह्या सर्व गोष्टी ऐकून सिंह ने विचार केला की मी पण कधी मध चाखले नाही. मी या अस्वलाशी मैत्री करून नक्कीच मध चाखू शकतो. 
 
मग सिंहने एक योजना बनवली. सिंह अस्वलाजवळ गेला आणि म्हणाला की, तू माला ओळखलेस का? तू जेव्हा तरूण होतास तेव्हा तू माला तलावातून मासे काढून खायला घातले होते. तू माझी अनेक वेळेस मदत केली आहे. मी नेहमी जंगलात हरवून जायचो आणि तुलाच भेटायचो. अस्वलाला काहीच आठवत नव्हते त्याने विचार केला की पूर्वीची गोष्ट आहे होऊ शकते मी कधी याची मदत केली असेल. मग सिंह म्हणाला की मी निघतो तुला जेव्हा पण कसली मदत लागली तर माला नक्की सांग एवढे बोलून सिंह गुफेकडे निघून गेला. अस्वल देखील त्याच्या घरी निघून गेले. पण त्याच्या डोक्यात सिंहचे बोलणे फिरत होते. चला कोणी तर आहे ज्याच्यासोबत मी बोलू शकतो. 
 
दुसऱ्या दिवशी सिंहने अस्वलासोबत बोलणे सुरु केले. अश्या प्रकार सिंह अस्वलशी मैत्री करू लागला. एक दिवस सिहाने अस्वलाला त्याच्या घरी जेवायला बोलवले. जेवणाचे आमंत्रण मिळताच अस्वलाला आनंद झाला. इकडे सिंह विचार करत होता की, काहीही झाले तरी तो अस्वलाला जेवण करू देणार नाही. त्याच्या मनात होते की मी माझे जेवण कोणाला कशाला देऊ. मी एकाच ताटात जेवण लावेल आणि लवकर संपवेल. जेव्हा अस्वल त्याच्या घरी जेवायला आले तेव्हा त्याने तसेच केले सिंह एकाच ताटात जेवण घेऊन आला. दोन्ही सोबत जेवण करण्यासाठी बसले तेव्हा अस्वल म्हातारे होते. तर हळू हळू खायला लागले. तेव्हाच सिंहने पटापट खाण्यास सुरवात केली आणि सर्व जेवण संपवून टाकले. अस्वल निराश झाले तेव्हा सिंह म्हणाला की मित्र मी रोज असेच जेवण करतो.  दुःखी मनाने अस्वल घरी परत आले. दुसऱ्या दिवशी चिमणीने अस्वलाला विचारले तू एवढा दुःखी का आहेस ? अस्वलाने सिंहाच्या घरी घडलेली सर्व गोष्ट सांगितली. मग चिमणी हसुन म्हणाली की, तुला माहित नाही का की सिंह कसा आहे ते, तो नेहमी मैत्री करतो आणि फायदा घेतो. आता तु त्याला धडा शिकव एवढे बोलून चिमणी उडून गेली. 
 
अस्वलाने ठरवले की तो सिंहला नक्कीच धडा शिकवेल. मग अस्वलाने सिंहला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. अस्वलने सिंहला मधबद्द्ल सांगितले. मग सिंह म्हणाला की मी आजपर्यंत मध चाखले नाही आता अस्वलाला सिंहला धडा शिकवण्यासाठी कारण मिळाले. सिंह आनंदित होऊन अस्वलाच्या घरी गेला. सिंह आलेला पाहून अस्वलाने त्याचे स्वागत केले. आणि बसायला सांगितले मग अस्वलाने आपल्या घराचे दार बंद केले. सिंहने विचारले तू दरवाजा का बंद करत आहेस मग अस्वल म्हणाले की जर कोणाला मधाचा वास आला तर तो पण येईल म्हणून मी दरवाजा बंद केला आता अस्वलाने मधमाशांचे पोळ सिंहासमोर आणून ठेवले आणि म्हणाला की यामध्ये मध आहे. जसे सिंहने त्यामध्ये तोंड घातले तर त्याला मधमाशांनी चावायला सुरुवात केली त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर सूज आली सिंह जिकडे पळायचा तिकडे मधमाश्या त्याच्या मागे जायच्या.  
मग सिंह अस्वलाला म्हणाला की, तू माला सांगितले का नाही की मध कसे खातात. मग अस्वल म्हणाले की मी  मध असेच खातो सिंह समजून गेला की अस्वलाने बदला घेतला म्हणून तो तिथुन काहीही न बोलता निघून गेला. 
 
तात्पर्य- 1. जर कोणाकडून मदत घेत असाल तर मदत करायला पण तयार असावे.
2. आपण जर दुसऱ्या बरोबर वाईट केले तर आपल्या बरोबर देखील वाईट होईल.
कारण कर्म हे कोणालाच सोडत नाही. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik