रविवार, 28 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (15:34 IST)

तेनलीरामची कहाणी : सोनेरी रोप

तेनालीराम प्रत्येक वेळी त्यांच्या बुद्धिचा असा उपयोग करायचे की विजय नगरचे महाराज कृष्णदेवराय आश्चर्यचकित व्हायचे. या वेळेस त्यांनी एका युक्तीने राजांना त्यांच्या निर्णयावर विचार करायला भाग पाडले. 
एकदा राजा कृष्णदेवराय एका कामानिमित्त कश्मीरला गेले. तिथे त्यांनी एक सोनेरी रंगाचे सुंदर फूल पाहिले. ते फूल राजाला एवढे आवडले की, विजय नगरला परत येतांना ते त्या फूलाचे रोप सोबत घेऊन आलेत. महालात येताच त्यांनी माळीला बोलवले आणि सांगितले की या रोपाला बगीच्यात अश्या ठिकाणी लाव की मी रोज माझ्या खोलीमधून त्याला पाहू शकेल. याला सोनेरी रंगाचे फूल लागतील. जे माला खूप आवडतात. या रोपाची काळजी घे. जर या रोपाला काही झालेत तर तुला प्राणदंड दिला जाईल. असे राजा कृष्णदेवराय माळीला म्हणालेत .
 
माळीने मान हलवून राजाकडून ते रोप घेतले. आणि ते रोप बगीच्यात लावले . दिवसरात्र त्या रोपाची काळजी घेतली जात होती. जसे दिवस गेलेत तसे त्या रोपाला सुंदर असे फूल आलेत. रोज राजा उठल्यावर आधी त्या फूलांना पहायचे मग दरबारात जायचे. एखाद्या दिवशी राजाला बाहेर जावे लागले आणि त्यांनी फूल पाहिले नाही तर त्यादिवशी त्यांचे मन उदास व्हायचे. 
 
एक दिवशी राजा जेव्हा त्या फूलाला पाहण्यासाठी खिडकीत आले तर त्यांना फूल दिसलेच नाही लगेच त्यांनी माळीला बोलवले राजा म्हणालेकी माला ते फूल दिसत नाहीये. ते रोप कुठे गेले. तेव्हा माळी म्हणाला की, महाराज काल संध्याकाळी माझ्या बकरीने त्या रोपाला खावून टाकले. हे ऐकल्यावर राजाला भयंकर राग आला. लगेच त्यांनी दोन दिवसांनी मृत्यदंड देण्यात यावा असा आदेश दिला. तेव्हाचा सैनिक आले आणि माळीला कारागृहात टाकले. 
 
माळीच्या पत्नीला जेव्हा समजले, तर ती राजाला विनंती करण्यासाठी दरबारात पोहचली. रागात असलेल्या राजाने तिचे काहीच ऐकून घेतले नाही. रडत रडत ती दरबारातून जायला लागली. एका व्यक्तीने तिला तेनलीरामकड़े जाण्याचा सल्ला दिला. रडत त्या माळीच्या पत्नीने तेनलीरामला सर्व हकीकत सांगितली. तिचे सर्व म्हणणे ऐकून तेनालीरामने तिला समजावून घरी पाठवले. 
 
दुसऱ्या दिवशी राग येऊन माळीची पत्नी त्या सोनेरी रोपाला खाणाऱ्या बकरीला चार रस्त्यावर नेऊन काठीने मारु लागली. आशामुळे बकरी अर्धमेली झाली. विजयनगर राज्यात प्राण्यांसोबत असा व्यवहार करण्यास बंदी होती. त्यामुळे तेथील काही लोकांनी माळीच्या पत्नीची तक्रार नगरच्या कोतवालकडे केली. मग कोतवालच्या शिपयाँना समजले की माळीला दंड देण्यात आल्यामुळे रागात येऊन बकरीला मारत आहे. हे समजल्यावर शिपाई ही गोष्ट दरबारात घेऊन गेलेत.  
 
राजा कृष्णदेवराय म्हणालेत की एवढा क्रूर व्यवहार कसकाय त्या प्राण्यासोबत करू शकते. मग माळीची पत्नी म्हणाली की या बकरीमुळे माझे कुटुंब उध्वस्त होणार आहे, मी विधवा होणार आहे, माझे मुलं अनाथ होणार आहे म्हणून मी असा व्यवहार केला. राजा कृष्णदेवराय म्हणालेत की तुझे बोलने माला समजले नाही हे मुके प्राणी तुझे घर कसे उधवस्त करेल. तिने सांगितले की ही तीच बकरी आहे जीने तुमच्या सोनेरी रोपाला खाल्ले. यामुळे तुम्ही माझ्या पतीला मृत्युदंड दिला. चुकी तर या बकरीची आहे, पण शिक्षा माझ्या पतीला मिळत आहे. खर तर शिक्षा या बकरीला मिळायला हवी म्हणून मी काठीने बकरीला मारत होते. आता राजाला हे समजले की चुक माळीची नाही तर बकरीची होती. हे समजताच राजाने  माळीच्या पत्नीला विचारले एवढी बुद्धि तुझ्याकडे कशी आली जी माझी चूक लक्षात आणून देईल . माळीची पत्नी म्हणाली की माला रडण्याशिवाय दूसरे काहीच सूचत नव्हते हे सर्व माला तेनलीरामने सुचवले. परत एक वेळेस राजाला तेनालीरामवर गर्व झाला. आणि राजा तेनलीरामला म्हणाला की तू परत एकदा माझ्या हातून चूक होण्यापासून वाचवली. मग राजा कॄष्णदेवरायने माळीला दिलेला प्राणदंड परत घेतला आणि त्याची करागृहातून सुटका केली तसेच तेनलीरामला त्याच्या हुशार बुद्धीसाठी बक्षीस म्हणून पन्नास हजार सुवर्ण मुद्रा उपहार म्हणून दिल्या. 
 
तात्पर्य- वेळच्या आधी कधीच हार मानू नये, प्रयत्न केल्यास मोठे संकट देखील टळले जाऊ शकते.   
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


Edited By- Dhanashri Naik