गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: सोमवार, 13 जुलै 2020 (09:17 IST)

Cooking Tips : या 10 टिप्स आपल्या अन्नाची चव वाढवेल

Cooking Tips
कुटुंबातील सदस्यांना खूश करणं सोपं आहे, कारण माणसाच्या हृदयात जाण्याचा मार्ग पोटातूनच जात असतो आणि खाण्याचे नाव ऐकून तोंडाला पाणी येतं.
इथे आम्ही पाककलेची आवड असणाऱ्यांसाठी सोप्या 10 पाक टिप्स सांगत आहोत.. 
 
* वाचलेल्या टोस्टला टाकून देऊ नका. त्याला हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाच्या घोळात मिसळून खमंग खुसखुशीत भजी बनवू शकता.
* पालक शिजवताना ह्यामध्ये चिमूटभर साखर घालावी, हिरवा रंग तसाच राहतो.
* भाजीना कुरकुरीत करण्यासाठी बेसनात तांदळाचे पीठ घालावं.
* बटाट्याचे वेफर्स किंवा चिप्स करण्यापूर्वी त्याचा वर चिमूटभर मिठाची कणी घालावी. वेफर्स किंवा चिप्स जास्त चविष्ट बनतील.
* जर आपण पराठे बनवत असाल तर त्यांना अजून जास्त चविष्ट करण्यासाठी कणकेत उकडलेला बटाटा किसून घालावा.
* उकडलेली अंडी पाण्याच्या ताटलीत ठेवून मगच फ्रीज मध्ये ठेवा. अंडी जास्त दिवस चांगली आणि सुरक्षित राहतील.
* हातातून लसणाचा दुर्गंध घालविण्यासाठी हातांवर चिमूटभर मीठ चोळावं.
* मठरी खमंग बनविण्यासाठी मैद्यात दही टाकून मळा आणि त्यात गरम तुपाचं मोयन घाला.
* पराठे तेल किंवा तुपात शेकण्याऐवजी लोणीमध्ये शेकावे पराठे जास्त चवदार होतात.
* भजी देताना त्यांवर चाट मसाला भुरभुरा, यामुळे त्याला चांगली चव येते आणि ते अजून चविष्ट लागतात.