मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 1 एप्रिल 2020 (15:57 IST)

झटपट किचन टिप्स

गृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे हा प्रश्र्न पडतो. अशा गृहिणींकरता स्वयंपाक घरातील चमत्कारी किचन टिप्स.
डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका. यामुळे डाळ पटकन शिजते आणि एक वेगळा स्वाद पण येतो.
बदाम जर 10 ते 15 मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवल्यास बदामाची साले चटकन निघण्यात मदत होते.
लसूणच्या पाकळ्या थोड्या गरम केल्यास त्याची साले पटकन निघतात.
जास्त लिंबाच्या रसासाठी लिंबू कोमट पाण्यात भिजवावे.
सुकं खोबरं तुरडाळीत ठेवलं तर खोबरं खराब होत नाही.
तांदूळ पाण्यात भिजवून ठेवल्यास तांदळाचा दाणा मोठा आणि मोकळा होतो.
बटाटे झटपट उकडण्याकरता बटाट्यामध्ये चिमूटभर हळद घालावी.
तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा स्वाद टिकून राहतो.
डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला कीड लागत नाही.
भाज्यांमध्ये शेवटी मीठ घातल्यास भाजीतलं लोह टिकून राहते.