सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2023 (21:44 IST)

Kitchen Tips: लिंबू जास्त काळ साठवून ठेवायचे असेल तर या पद्धतींचा अवलंब करा

Tips For Store Lemons:  उन्हाळ्यात प्रत्येक घरात लिंबाची गरज असते. तुम्हाला बहुतेक घरांमध्ये लिंबू सापडेल. त्याच्या मदतीने अनेक गोष्टी बनवल्या जातात. ते खूप अम्लीय आहेत, ज्यामुळे त्यांना योग्य तापमानात साठवणे फार महत्वाचे आहे. नाही तर लिंबू लवकर खराब होण्याची शक्यता असते. 
 
लिंबू साठवण्याचा विचार करत असाल, तर लक्षात ठेवा की ते खरेदी करतानास्टोरेजसाठी नेहमी ताजे, पातळ-त्वचेचे लिंबू खरेदी करा.ते जास्त रसाळ असतात.लिंबू साठवण्याच्या काही टिप्स जाणून घेऊ या. 
एअर टाइट कंटेनर वापरा
 
लिंबू साठवण्यासाठी एअर टाइट कंटेनर हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला फक्त ते धुवून वाळवावे लागतील. यानंतर पॉलिथिनमध्ये पॅक करून हवाबंद डब्यात ठेवा. हा डबा फ्रीजमध्ये ठेवा. 
 
लिंबू ठेवण्यासाठी तेल वापरा- 
लिंबू साठवण्यासाठी लिंबुवर तेल लावा आणि त्यांना एका डब्यात ठेवा. हा डबा फ्रिज मध्ये ठेऊ शकता. 
 
झिप लॉक बॅग घ्या -
लिंबू साठवण्यासाठी झिपलॉक बॅगचा वापर करा. हे सहज बाजारात उपलब्ध आहे. आपण लिंबू त्यात साठवू शकता. 
 
अॅल्युमिनियम फॉयल मध्ये गुंडाळून ठेवा -
लिंबू साठवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळा. अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळल्याने ओलावा बाहेर जाण्यापासून रोखण्यास मदत होईल. यानंतर तुम्ही लिंबू बराच काळ साठवून ठेवू शकता. 
 


Edited by - Priya Dixit